31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयअखेर चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी

अखेर चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी

टीम लय भारी 

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात ओबीसी आरक्षणावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाकयुद्ध रंगले होते. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना घरी जा, स्वयंपाक करा, असा सल्ला दिला होता. त्यांच्या या विधानावर अनेकांनी टीका केली होती. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil)  यांनी पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्य महिल्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिले आहे.

अखेर चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी

चंद्रकांतदादांनी म्हणतात… (chandrakant patil)

आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap,सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही. माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.

अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा मुंबईत दणक्यात होणार, गणेश हाके यांचा पुढाकार (जाहीरात)

अखेर चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी

 

हे सुद्धा वाचा: 

बारामतीच्या आजोबा अन् नातवाला राजकारणासाठी अहिल्यादेवींचा साक्षात्कार झालाय : गोपीचंद पडळकर

“BJP Will Make Your Kids Goons, Rapists”: Arvind Kejriwal In Haryana

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी