28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयहिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो’ छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी...

हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो’ छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही -चंद्रकांत पाटील

टीम लय भारी

शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात हिंदुत्वाची व्होटबँक विकसित केली, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी कळस चढवला, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन टीकेचे मोहोळ उठले आहे(Chandrakant Patil’s comment on Hindu Dharma)

या वक्तव्यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर आगपाखड केली आहे. चंद्रकांत पाटील आणि नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांना क्षुद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे आहेत.

बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड, UIDAI च्या नव्या उपक्रमाबद्दल जाणून घ्या

अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंची पोलिसात तक्रार

तिकीट पक्षाचं असतं त्यामुळे माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं, व्होट बँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते.

त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडंसं उपयोगी पडतं. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचितची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी

‘Chhatrapati Shivaji created Hindu vote-bank, Vajpayee-Modi realised it’

त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही. त्यांनी शंकराची पूजा केली आणि हिंदू धर्माची पूजा केली. कारण हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो, असं वक्तव्यही पाटील यांनी केलं आहे.राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होतं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी माझं तिकीट कापलं असं म्हणणं चुकीचं असल्याचं सांगत ते तिकीट आणि व्होट बँक पक्षाची असते असं म्हटलं. तसंच ही व्होट बँक वर्षानुवर्षे मेहनत घेत विकसित करण्यात आलेली असल्याचं सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी