29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रचंद्रकांतदादा पाटील म्हणाले, तुम्ही दिल्लीत जा; नाहीतर मसणात जा

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, तुम्ही दिल्लीत जा; नाहीतर मसणात जा

टीम लय भारी

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने आज मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrakat Patil) यांनी ‘महाविकास आघाडी’ सरकारवर सडकून टीका केली. तुम्ही दिल्लीत जा, नाहीतर मसणात जा. पण ओबीसींना आरक्षण लागू करून घ्या, अशी संतप्त मागणीवजा प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी केली. (Chandrakat Patil criticizes state government over OBC reservation)

आज ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.ओबीसींच राजकीय आरक्षण जाण्यामागे राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी भाजपने केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakat Patil), नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी आंदोलकांनी राज्यसरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण मोर्चाचं नेतृत्व योगेश टिळेकर करत आहे. मध्य प्रदेशात पुन्हा ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू शकतं मग महाराष्ट्राला का नाही? महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारची मदत घेऊन ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा असं म्हणत भाजपने राज्यसरकारवर तोफ डागली आहे.

 

ओबीसी आरक्षणाबाबत मविआ सरकार फक्त धूळफेक करतं आहे आणि या सरकारची नाटकबाजी आता सगळ्यांच्याच लक्षात आलेली आहे,असा खोचक टोला चंद्रकांत पाटील (Chandrakat Patil) यांनी लगावला आहे.


हे सुद्धा वाचा : 

 

आरक्षणासह ओबीसी समाजाच्या सर्व समस्या सोडवा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा व फडणवीस सरकारच !: नाना पटोले

‘आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, पण भाजपा ओबीसींना २७ टक्के आरक्षण देईल’

माजी आमदार प्रकाश शेंडगे आक्रमक, ओबीसींच्या प्रश्नांवर आझाद मैदानात तीव्र आंदोलन सुरू !

OBC Reservation: महाराष्ट्र निकाय चुनाव में ओबीसी आरक्षण को लेकर बीजेपी का हल्ला-बोल, सरकार के खिलाफ किया प्रदर्शन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी