28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायण राणेंना म्हणाले होते, ‘नवी नवरी’

मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायण राणेंना म्हणाले होते, ‘नवी नवरी’

टीम लय भारी

मुंबई : काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे प्रचंड हुशार व बुद्धिमान व्यक्तीमत्व होते. मुख्यमंत्रीपदाच्या काटेरी खूर्चीत बसलेले असले तरी ते सतत हसतमुख असायचे. दिलखुलासपणे बोलायचे. विलासरावांनी असेच एक दिलखुलासपणे केलेले विधान प्रचंड गाजले होते, त्यावर वादंग सुद्धा झाले होते (Chief Minister Vilasrao Deshmukh had told Narayan Rane).

विलासराव देशमुख यांनी हे विधान नारायण राणे यांच्याविषयी केले होते. त्यावेळी देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नारायण राणे यांनी त्यावेळी नुकताच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते, अन् काँग्रेसने त्यांना महसूल मंत्री हे पद दिले होते.

दिवंगत विलासराव देशमुखांची आठवण येतेय, अन्यायग्रस्त एका कुटुंबाची कैफियत

‘विलासराव देशमुखांच्या जागी बाळासाहेब थोरातांना पाहतो’

काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतरही नारायण राणे हे आपल्या बोलभांड स्वभावानुसार वादग्रस्त विधाने करायचे. काँग्रेसची संस्कृती संयमी आहे. पण नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही आदळआपट करायचे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राणे यांच्याविषयी प्रश्न विचारला होता.

पत्रकारांच्या प्रश्नावर देशमुख यांनी दिलखुलास उत्तर दिले होते. नारायण राणे हे आमच्या पक्षात नवीन आले आहेत. लग्न झाल्यानंतर नवी नवरी सासरी जाते. सासरी बोलायचे कसे. वागायचे कसे. कोणते भांडे कुठे ठेवायचे हे नव्या नवरीला व्यवस्थित माहित नसते. पण नंतर नव्या नवरीला सगळे व्यवस्थित समजते. राणेंनाही नंतर पक्षात कसे वागायचे, कसे बोलायचे हे समजेल, असे दिलखुलास विधान विलासराव देशमुख यांनी केले होते (This heartfelt statement was made by Vilasrao Deshmukh).

नारायण राणे ‘कोंबडी चोर’ शिवसेनेची पोस्टरबाजी

Sena Seeks Case Against BJP Leader For Linking Narayan Rane, Warrior King

विलासराव देशमुख यांच्या या विधानाच्या बातम्या दुसऱ्या दिवशी बहुतांश वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या. पण सामनाच्या बातमीने मोठाच राडा झाला होता. ‘नववधू प्रिया मी बावरते’ अशा मथळ्याखाली सामनाने बातमी दिली. राणे यांचे छायाचित्र मॉर्फिंग करून मुंडावळ्यातील नव्या नवरीचे छायाचित्र बनविण्यात आले. ‘सामना’ने कल्पक व विनोदी पद्धतीने नारायण राणे यांच्यावर घाव घातला होता (Saamana had hurt Narayan Rane in an ingenious and humorous manner).

त्यावेळी नारायण राणेंचा मोठा दरारा होता. कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे होती. त्यांची घोटाळेबाज प्रतिमाही त्यावेळी एवढी नावारूपाला आलेली नव्हती. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी ‘सामना’च्या विरोधात जोरदार आंदोलने केली होती (Angry activists staged agitation against the match).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी