32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीय‘थंड‘ डोक्याचे षडयंत्र ; की ‘ईडी‘ची काडी

‘थंड‘ डोक्याचे षडयंत्र ; की ‘ईडी‘ची काडी

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदेंनी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा निष्ठावान नेता अशी स्वतःची ओळख निर्माण केली. स्व:कृत्वाने त्यांनी पक्षाला पुढे नेले. त्यांचे नेतृत्व आणि कतृत्व ठाणेकरांच्या पसंतीस उतरले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. धर्मवीर आनंद दिघे नंतर त्यांनी ठाणेकरांच्या मनात स्थान निर्माण केले. आज अनेक ठाणेकरांनी तसेच ठाण्यातल्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाचे समर्थन केले. एकनाथ शिंदेनी केलेले बंड ‘शांत‘ डोक्याने केलेले षडयंत्र आहे. हे कारण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी या बंडात सहभागी झालेल्या नेत्यांना ‘ईडी‘ ची भीती आहे का? हे एक कारण आहे. ईडी एखाद्याच्या मागे लागली, तर संसाराला काडी लागते. सगळे डाव चौपट होतात. अनं होत्याचे नव्हते होते.

मेलो तरी शिंदे सोबत राहू
शिंदे साहेबांनी ‘योग्य वेळी योग्य निर्णय‘ घेतला. आम्ही साहेबांबरोबर आहोत. ‘आम्ही मेलो तरी साहेबांबरोबरच राहू. एकनाथ शिंदे जर उपमुख्यमंत्री झाले तर ठाणे जिल्ह्याचा विकास होईल. बाळासाहेब ठाकरेंची हिंदूत्वाची भूमिका एकनाथ शिंदेनी घेतली. ते भाजपबरोबर जात आहेत. भाजप हा हिंदूत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे. कट्टर शिवसैनिकांना एकनाथ शिंदेचे हे बंड आवडले आहे.

वादळापूर्वीची शांतता
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे एक शांत नेते आहेत. ते कमी बोलतात. जास्त वायफळ बडबड करत नाही. कधी मोठ्या बाता मारत नाहीत. आपल्या मनातल्या भावना उघड करत नाहीत. त्यामुळे मतदारसंघात तसेच शिवसैनिकांमध्ये त्यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांचे वागणे मैत्रिपूर्ण असल्याने अनेक आमदारांनी त्यांना मदत केली. एकनाथ शिंदेच्या मनात अपमानाची खदखद अनेक दिवसांपासून होती. तीच खदखद ज्वालामुखी सारखी विधान परिषदेच्या निवडणुकीत उफाळून आली. त्यामुळे हे वादळ येण्यापूर्वी एकनाथ शिंदे सगळ्यांना शांत वाटत होते. ते असे करतील याची कोणाही कल्पना नव्हती. यालाच म्हणता ‘वादळा पूर्वीची शांतता‘.

त्यांना आता ‘ईडी‘ची भीती नाही
ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात अनेक नामांकीत नेते आहेत. ते हिंदूत्वाचा पुरस्कार करतात, म्हणून त्यांना भाजपसोबत जावेसे वाटते. अनेकांच्या मनात राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस बद्दल राग आहे. अनेकांना शरद पवारांच्या हातातले कळसूत्री बाहुले बनायचे नाही. अशी एक ना अनेक कारणं या बंडामागे आहेत.

ठाकरे सरकारमधील महत्वाच्या खात्यांवर असलेले अनेक मंत्री ‘धनाढ्य‘ आहेत. स्वतः एकनाथ शिंदेकडे देखील कोट्यवधींची संपत्ती आहे. ते कधीच ईडी विरोधात बोलत नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्यावर टीका करत नाही. आशा धनवंतांना ईडीची भीती आहेच. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्याची चर्चा सुरु आहे. शिवाय मोदी, अमित शहांवर टीका केली तर ईडीची नोटीस दारात येते. त्यामुळे अनेक नेते मोदी शाहाच काय भाजपच्या विरोधात बोलण्यासही धजावत नाहीत.

ईडीचा ससेमीरा मागे लावून घेण्यापेक्षा फडवीस आणि भाजपबरोबर हातमिळवणी केलेली बरी, असे अनेक नेत्यांना वाटते. संजय राऊत वगळता शिवसेनेचा कोणताही नेता भाजपवर टीका करतांना दिसून येत नाही. त्यामुळे या बंडाची सूत्र पडद्यामागून हलवली गेली. या घटनेचा मूळ चेहरा एकनाथ शिंदे असले तरी, पडद्यामागचा सूत्रधार वेगळाच आहे. नाहीतर आमदाराचे अपहरण करुन त्यांना गुजरातला आणि गुवाहाटीला नेले नसते. आता शिंदे समर्थक आमदारांना ईडीची भीती नाही. हे भारतातीलं शेंबडं पोरंगं देखील सांगेल यात शंकाच नाही.

हे सुद्धा वाचा : 

रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंना दिला फुकटचा सल्ला !

Exclusive : राष्ट्रवादी काँग्रेसचीही भाजपसोबत जाण्याची तयारी

मध्यावधी निवडणुकांची काॅंग्रेसला भरली ‘धडकी‘ ; राष्ट्रवादी काॅंग्रेसची ‘नो कमेंटस‘

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी