34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रतडजोड ही करावीच लागणार - उपमुख्यमंत्री

तडजोड ही करावीच लागणार – उपमुख्यमंत्री

टीम लय भारी

मुंबई:सत्तेत सहभागी होताना तडजोड करावीच लागणार,आज झालेल्या कार्यकारिणी बैठकीत फडणवीसांनी सांगितले. मोठा पक्ष आहे. अनुभवी, चांगले नेते आहेत असेही काही आमदार आहेत. मंत्री झाले नाहीत पण त्यांनी कामाची चुणूक दाखवली आहे. सगळ्यांचा विचार करावा लागेल पण विचार करायला तेवढ्या जागाच नाहीत असे फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले आहे.

सत्तेत सहभागी होताना काहींना त्याग करावाच लागणार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या स्थापनेला 20 दिवस लोटली. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यातच शिंदे गट आणि भाजपमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले. भाजपच्या वाट्याला किती जागा मिळणा  असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत इच्छुकांचे कान टोचले. आपल्या पक्षात या विस्तारात येऊ शकणारे पात्र असलेले नेते खूप आहेत. कारण मोठा पक्ष आहे. अनुभवी, चांगले नेते आहेत, असेही काही आमदार आहेत.

जे मंत्री झाले नाहीत पण त्यांनी कामाची चुणूक दाखवली आहे. सगळ्यांचा विचार करावा लागेल पण विचार करायला तेवढ्या जागाच नाहीत. असं फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हा विचार संपतो तेव्हा पक्ष संपतो. जे पक्ष विचारासांठी चालले ते पक्ष चालले.  ज्यावेळी विचार सोडून सत्तालोलुप झाले. त्यावेळी ते पक्ष संपले. ज्यावेळी फक्त एकाधिकारशाही, घराणेशाही झाली. त्यावेळी ते पक्ष संपले.विचाराने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यागाची भूमिका स्वीकारावी लागते.अनेक लोक नंतर मला विचारतात. त्याग आम्हीच करायचा का? पण कुणालातरी करावाच लागेल.  त्यामुळे आपल्याकडील ही परंपरा आपल्याला कुठल्याही स्थितीत पुढे घेऊन जायची आहे.

मी आपल्याला एवढंच आश्वस्त करु इच्छितो की, आपल्याला प्रामाणिक, स्वच्छ आणि लोकाभिमुख सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्या जनतेच्या समस्या आहेत. आशा,आकांक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही स्वच्छ मनाने करु, असंही फडणवीस यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितलं.पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळे लोक उभे राहतील.
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे.

हे सुध्दा वाचा:

राजकारणाचे तीन तेरा, जनता देखती सिर्फ मेरा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उडाली झोप

मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचे घर सिलेंडर स्फोटात जळून झाले राख

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी