29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयआमदार जिग्नेश मेवाणींच्या अटकेप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळानी घेतली राज्यपालांची भेट

आमदार जिग्नेश मेवाणींच्या अटकेप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळानी घेतली राज्यपालांची भेट

टीम लय भारी 

मुंबई : गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना त्यांच्या ट्विटशी संबंधित एका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आसामच्या बारपेटा पोलिसांनी त्यांना आणखी एका प्रकरणात पुन्हा अटक केली. यासंदर्भात आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. या गुजरात आमदारावरील अन्यायकारक कारवाईचा निषेध करणारे निवेदन काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यापालांना दिले. (Congress delegation called on the Governor regarding the arrest of MLA Jignesh Mewani)

राज्यपालांनी निवेदन स्वीकारलं असून जिग्नेश मेवाणीला स्थानिक कोर्टानं जामीन देऊनही पुन्हा अटक केली आहे. राज्यपालांनी ही बाब राष्ट्रपतींना कळवावी यासाठी काँग्रेस शिष्टमंडळाने विनंती केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण

जिग्नेश मेवाणी यांना 19 एप्रिल रोजी गुजरातमधील पालनपूर शहरातून अटक करण्यात आली होती. कोक्राझार पोलीस ठाण्यात त्यांच्या एका ट्विटवर एफआयआर नोंदवण्यात आला होता. कोक्राझारच्या मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी 21 एप्रिलला त्यांना तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली होती.गोडसेला देव मानणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील जातीय संघर्षांविरोधात शांतता राखण्याचे आवाहन करावे. अशा आक्षेपार्ह ट्विटमुळे आमदार जिग्नेश मेवाणी अडचणीत आले .

मेवाणी यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, समाजामध्ये द्वेष निर्माण करणे, शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने वादग्रस्त वक्तव्य करणे या आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मेवाणी यांनी १८ एप्रिलला केलेले दोन ट्विट आता काढून टाकण्यात आले आहेत. मेवाणी यांच्या अटकेचे माहिती मिळताच काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर आणि इतर नेत्यांनी अहमदाबाद विमानतळावर धाव घेत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.


हे सुद्धा वाचा : 

पक्ष संघटनेच्या तळाशी राहून प्रामाणिकपणे काम करणारे सच्चे कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब थोरात : सत्यजित तांबे

पक्ष संघटनेच्या तळाशी राहून प्रामाणिकपणे काम करणारे सच्चे कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब थोरात : सत्यजित तांबे

राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणा-या धर्मांध शक्तींना कोल्हापूरच्या जनतेने नाकारले : बाळासाहेब थोरात 

बाळासाहेब थोरातांचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी