36 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमुंबईभाजपने आपल्या पक्षाच्या घटनेतून ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द काढून ‘जातीयवाद’ जोडावा : सचिन सावंत

भाजपने आपल्या पक्षाच्या घटनेतून ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द काढून ‘जातीयवाद’ जोडावा : सचिन सावंत

टीम लय भारी

मुंबई : देशात धार्मिक उन्माद वाढवण्याचे भाजपाचे पद्धतशीपणे प्रयत्न सुरु असून मदरशांचा मुद्दाही त्यातील एक भाग आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंता विश्वशर्मा यांनी मदरसे अस्तित्वातच नसावेत असे म्हटले आहे. नव्याने धर्मांतर केलेले अधिक (Congress leader Sachin Sawant) कट्टर असतात अशी म्हण आहेच. (Congress leader Sachin Sawant criticizes BJP leaders)

याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदरशांना सरकारी अनुदान देण्यावर बंदी घातली आहे. हा सर्व प्रकार भाजपचा ढोंगीपणा उघड करणारा आहे. भाजपाला देशाचे संविधान मान्य नाहीच पण सावरकरांचा राष्ट्रवाद ही यांना मान्य नाही. भाजपाने आपल्या पक्षाच्या घटनेतून “धर्मनिरपेक्षता” हा शब्द काढून त्याऐवजी “जातीयवाद” जोडावा, असा टोला (Congress leader Sachin Sawant) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी लगावला आहे.

 

२० ऑगस्ट २००१ रोजी मुरली मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले होते की वाजपेयी मदरशांच्या कामात हस्तक्षेप करू इच्छित नाहीत. २००२ मध्ये वाजपेयी सरकारने १००० मदरशांना अनुदान दिले. भाजपा वाजपेयींना (Congress leader Sachin Sawant) विसरली असेल तर ठीक आहे पण २०१२ मध्ये गुजरातच्या भाजपा जाहीरनाम्यात तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री मोदींनी तर २०१४ च्या लोकसभा जाहीरनाम्यात भाजपने मदरशांचे आधुनिकीकरण करण्याचे आश्वासनही दिले होते.

११ जून २०१९ रोजी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मदरशांच्या आधुनिकरणासाठी पावलं उचलून तेथील शिक्षकांना अन्य संस्थांकडून हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व संगणक विषयाचे प्रशिक्षण देऊन मदरशांतील विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा लाभ मिळेल याकरता योजना जाहीर केली होती. हे सर्व तोंडदेखले होते हे स्पष्ट आहे असे (Congress leader Sachin Sawant) सावंत म्हणाले.

भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये गोळवलकर असतात आणि भाजपाची भुमिका दांभिकपणाची व दुटप्पी असते यात कोणतीही शंका नाही. हेमंता विश्वशर्मा व योगी आदित्यनाथ यांची मदरशासंदर्भातील भूमिका पाहता मोदींचा ‘सबका का साथ, सबका विश्वास,’ हा सुद्धा एक चुनावी जुमलाच आहे (Congress leader Sachin Sawant) असे म्हणाले लागेल, असे सचिन सावंत म्हणाले.

हे सुद्धा वाचा :- 

Kabil Sibal Says He Is Ex Congress, To Run Again For Rajya Sabha

महसूल विभागात धक्कादायक प्रकार, वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली

OBC आरक्षणाचा खून पडल्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार : अमोल मिटकरी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी