31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
HomeनिवडणूकOBC आरक्षणावर आज न्यायालयात निकाल, पण त्या अगोदरच धनंजय मुंडेंनी दिले २७...

OBC आरक्षणावर आज न्यायालयात निकाल, पण त्या अगोदरच धनंजय मुंडेंनी दिले २७ टक्के आरक्षण !

टीम लय भारी

बीड : राज्यामध्ये दोन दिवसाआधीच राज्य निवडणूक आयोगाकडून ९२ नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. पण या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. परंतु ओबीसी आरक्षणाचा निकाल जो काही येईल, तो येईल. पण परळी नगरपरिषदेत ओबीसींना २७% जागा देणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे आमदार आणि माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केली आहे.

शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र राज्यातील तब्बल ४ नगर पंचायती आणि ९२ नगर परिषदांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पण अद्यापही ओबीसी आरक्षणाचा निकाल मार्गी न लागल्याने हा निकाल येईपर्यंत निवडणूक न घेण्याचे महाविकास आघाडीचे सरकारने मत व्यक्त केले होते. पण आता भाजप-शिंदे सरकार येताच राज्य निवडणूक आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या असलेल्या राज्यातील सरकारने याबाबतचा निकाल लवकरात लवकर पाठपुरावा करून मार्गी लावावा. तसेच त्यानंतरच राज्यात निवडणुका घ्याव्यात. अशी भूमिका धनंजय मुंडे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली आहे. परंतु याबाबतचा निर्णय येईल तेव्हा येईल पण आगामी नगर परिषद निवडणुकीत परळी नगर परिषदेत ओबीसींना २७% जागा देण्याचा निर्णय धनंजय मुंडेंनी जाहीर केला आहे.

त्यांच्या या निर्णयानंतर नेमके काय होते, हे पाहावे लागणार आहे. ओबीसी आरक्षणाचा बांठिया आयोगाकडून गोळा करण्यात आलेल्या इम्पिरिकल डेट्याचा अहवाल अजूनही न्यायालयात देण्यात आलेला नाही. दरम्यान, ओबीसींवर कोणताही अन्याय होणार नाही, याचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे धनंजय मुंडेंनी सांगितले. महत्वाची बाब म्हणजे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात गेल्या १० वर्षांपासून परळी नगर परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे.

हे सुद्धा वाचा :

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याची जयंत पाटील यांनी केली विनंती

ओबीसी आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा :  शरद पवार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी