30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeआरोग्य१२ ते १४ वयोगटाचे लसीकरण मंदगतीने सुरु

१२ ते १४ वयोगटाचे लसीकरण मंदगतीने सुरु

टीम लय भारी

मुंबई : राज्यात १२ ते १४ वयोगटाचे लसीकरण सुरू होऊन जवळपास १५ दिवस उलटून गेले आहेत. परंतु या वयोगटातील लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. राज्यभरात ३० टक्के बालकांचे लसीकरण झाले आहे. सर्वात कमी आकडा मुंबईतील लसीकरणाचा आहे. करोनाची तिसरी लाट ओसरल्यामुळे लसीकरणाचा एकूणच जोर गेल्या महिनाभरापासून कमी झाला आहे. त्याच आता संपूर्ण महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला आहे.(covid vaccine for kids)

१२ ते १४ वयोगटाचे लसीकरण १६ मार्चपासून सुरू झाले. या वयोगटासाठी लसीकरण खुले झाल्यानंतर लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते, मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे या वयोगटाचे लसीकरण करून घेण्यास पालकांनी दुर्लक्ष केले. राज्यभरात सुमारे ३० टक्के बालकांचे लसीकरण (covid vaccine for kids) झाले आहे. लवकरच या बालकांचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरणही आता १६ एप्रिलपासून सुरू होईल, परंतु त्या तुलनेत प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काय करावे असा प्रश्न जिल्ह्यांसमोर उभा राहिला आहे.

१२ ते १४ वयोगटातील लसीकरणाच्या तुलनेने १५ ते १८ वयोगतटातील लसीकरणाला (covid vaccine for kids) मो़ठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. एकूण लसीकरणामध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या मुंबईत मात्र बालकांच्या लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद हा केवळ ७ टक्केतच आहे.

अकोला, परभणी, बुलढाणा, नंदुरबार, नागपूर, नांदेड, जालना, औरंगाबाद येथे २० टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण झाले आहे. ठाण्यामध्ये २० टक्के बालकांनी लस घेतली आहे. शाळा देखील आता पूर्ण वेळ चालू ठेवल्या जात आहे. अशातच कोरोनाचे नवीन विशांणू पुन्हा जगभरात थैमान घालत आहे. या पाश्वभूमीवर पालकांनी दुर्लक्ष न करता आपल्या पाल्याचे लसीकरण (covid vaccine for kids) केले पाहिजे.

हे सुध्दा वाचा : 

SII’s Covovax becomes the fourth jab to be used for vaccination of 12-17 age group

लवकरच खुल्या बाजारात देखील कोवॅक्सिन, कोविशिल्ड लस मिळणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी