26 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरक्रिकेटएंजेलो मॅथ्यूज झाला 'टाइम आउट', आता मॅचनंतरही होणार कारवाई

एंजेलो मॅथ्यूज झाला ‘टाइम आउट’, आता मॅचनंतरही होणार कारवाई

सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप आता शेवटच्या टप्प्याजवळ पोहोचला आहे. येत्या आठवड्याभरात स्पर्धेतील साखळी सामने संपून नॉकआउट सामन्यांना सुरुवात होईल. काल, सोमवारी (6 ऑक्टोबर) झालेल्या श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेवर तीन विकेट्स राखून विजय मिळवला. मात्र, वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात वादग्रस्त सामन्यांपैकी एक ठरला आहे. या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणी फलंदाज टाइम आउट होऊन बाद झाला आहे. श्रीलंकेच्या एंजेलो मॅथ्यूज याला टाइम आउट पद्धतीने बाद ठरवण्यात आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे, संपूर्ण सामन्यात आणि सामन्यानंतरही हा वाद कायम दिसून आला.

राजधानीतील अरुण जेटली स्टेडियम येथे झालेल्या श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. चरीथ असलंका याच्या 108 धावांच्या शतकी खेळीमुळे श्रीलंकेने 49.3 षटकांत सर्वबाद 279 धावा केल्या. परंतु, एंजेलो मॅथ्यूजच्या टाइम आउट होण्यावरून हा सामना चांगलाच गाजला.


बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर सदिरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर एंजेलो मॅथ्यूज मैदानात आला. मॅथ्यूज मैदानात आल्यावर पहिला चेंडू खेळण्याआधी हेल्मेट नीट करण्याच्या नादात त्याच्या हेल्मेटची पट्टी तुटली. त्यासाठी, त्याने नवे हेल्मेट मागवले. पण, नियमांपेक्षा अधिक वेळ घेतल्याने.शाकीब अल हसनने अंपायरकडे अपील केली. त्यामुळे, अंपायरने मॅथ्यूजला टाइम आउट ठरवले. त्यानंतरही, मैदानावरील दोन्ही अंपायर्स आणि मॅथ्यूज यानेही शाकीबकडे त्याच्या आपिलवर पुनर्विचार करण्याची मागणी केली. तरीही, शाकीब आपल्या निर्णयावर अडून राहिला आणि मॅथ्यूजला तंबूत परतावे लागले. बांगलादेश संघ आणि कर्णधार शाकीब अल हसनच्या कृतीमुळे मॅथ्यूज आणि क्रिकेट चाहते नाराज झाले.

नंतर, फलंदाजीस उतरलेल्या बांगलादेश संघाला विजयासाठी 280 धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य पार करत असताना शाकीब अल हसन मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यावेळी, मॅथ्यूजने स्पेशल सेलेब्रेशन करत शाकीबला घड्याळ दाखवत निरोप दिला. शाकीबने 82 धावांची खेळी केली. बांग्लादेशने हा सामना 3 विकेट्सने जिंकला मात्र सामन्यातील धुसफूस सामना संपल्यावरही पाहायला मिळाली. एंजेलो मॅथ्यूज आणि श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडीस यांनी सरळसरळ अंपायर्सला लक्ष करत त्यांनी चुकीचा निर्णय दिल्याचे सांगितले.

हे ही वाचा 

विराट कोहलीचे मी अभिनंदन का करायचे? ‘या’ संघाच्या कर्णधाराचा पत्रकारांना उलट सवाल

किंग कोहलीचा बर्थडे अन् शतकी खेळीची प्रतीक्षा

कुस्ती एक, स्पर्धांची शहरे दोन

काय म्हणाला एंजेलो मॅथ्यूज?

एंजेलो मॅथ्यूजने सामन्यानंतर मोठे व्यक्तव्य करत अंपायर्सवर टीका केली. तो म्हणाला, “अंपायर्सने चूक केली. त्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हेल्मेट दुरुस्त केल्यानंतर माझ्याकडे 5 सेकंदाचा अवधि शिल्लक होता. हेल्मेटशिवाय मी गोलंदाजीचा सामना करू शकणार नव्हतो. सुरक्षा सर्वात महत्वाची होती.”

कर्णधार कुसल मेंडीसचे व्यक्तव्य चर्चेत

श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडीस याने हा मुद्दा पुढे रेटत थेट अंपायर्सच्या कॉमन सेन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. तो म्हणाला, “एंजेलो मॅथ्यूजच्या हेल्मेटबद्दल जे झालं, ते कोणाबरोबरही होऊ शकतं.. मी अंपायर्सच्या निर्णयावर नाराज आहे. त्यांचा कॉमन सेन्स समजण्यापलीकडचा होता.”

एंजेलो मॅथ्यूज आणि कुसल मेंडीस यांच्या या व्यक्तव्यावरून आता आयसीसीकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी