27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरक्रिकेटऑस्ट्रेलियाचे जबरदस्त कमबॅक, श्रीलंका स्पर्धेबाहेर जाण्याची चिन्हे

ऑस्ट्रेलियाचे जबरदस्त कमबॅक, श्रीलंका स्पर्धेबाहेर जाण्याची चिन्हे

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या झालेल्या झालेल्या वनडे विश्वचषक सामन्यात आखेर ऑस्ट्रेलियाने विजयाचे खाते खोलले आहे. तर श्रीलंकेला सलग तिसऱ्याही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागत आहे. एवढेच नाही तर सुरू असलेल्या विश्वचषकात त्यांना 6 पैकी 6 सामने जिंकावे लागतील. अन्यथा श्रीलंका संघ विश्वचषक स्पर्धेतून बाद होऊ शकतो. ऑस्ट्रिलिया हा एक तुल्यबळ संघ आहे. मात्र तरीही या संघाला सुरुवातीला 2 सामन्यांचा पराभव पत्करावा लागला होता.

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या सामन्यावर नजर टाकली तर श्रीलंकेचे फलंदाज कुसल परेरा याने 67 तर पथूम निसंका याने 78 धावा केल्या. 125 धावांची पार्टनरशिप झाली. यावेळी या सामन्याला हे दोन फलंदाज पुढे घेऊन जातील, असे वाटले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने आगीचे गोळे फेकल्या सारखे चेंडू फेकलेत. धडाधड गडी बाद केले. मिचेल स्टार्कने 43 धावा देत 2 गडी बाद केले तर पॅट कमिन्सने 2 गडी बाद करत 32 धावा दिल्या. ॲडम झम्पाने 4 गडी बाद करत 47 धावा दिल्या. 125 धावांच्या पार्टनरशिपच्या मदतीने श्रीलंकेचा संघ 209 धावांवर तंबूत पाठवला. यावेळी श्रीलंकेची पळता भुई थोडी झाली.

हेही वाचा

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र की महा’ड्रगनिर्मितीराष्ट्र’? नाशिकनंतर सोलापूरमध्येही ड्रग्जचा कारखाना

खुशखबर! सार्वजनिक बांधकांम विभागात 2109 पदांची सरळसेवा मेगाभरती

ऑस्ट्रेलियाचा डाव

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची सुरुवात म्हणावी अशी झाली नाही. सुरुवातीला डेव्हिड वॉर्नरने 11 धावा करत तंबूचा रस्ता धरला. यावेळी अम्पायरने दिलेल्या निर्णयावर वॉर्नर नाराज होता. तर स्टीव्ह स्मिथ धावांचं खाते न खोलता तंबूच्या आश्रयाला गेला. मात्र मिचेल मार्शने चांगली कामगिरी करत अर्धशतक पूर्ण केले. मार्शने 51 चेंडूत 52 धावा केल्या असून धाव बाद झाला. मार्नस आणि जोश इंग्लिश यांनी 86 चेंडूत 77 धावांची पार्टनरशिप केली. मार्नस ह मधुशंकाच्या गोलंदाजी वेळी झेलबाद झाला. इंग्लिशने 58 धावा करत सामन्याला योग्य स्थितीत नेऊन पोहचवले. मॅक्सवेलने आणि मार्कस स्टॉयनिस यांनी 35.2 षटकांत सामना संपवला.

 श्रीलंका स्पर्धेतून बाहेर जाणार?

श्रीलंकेचा विचार केला तर श्रीलंकेचा तीनही सामन्यात पराभव झाला. तर ऑस्ट्रेलियाचा सुरू असलेल्या विश्वचकात 2 सामन्यात पराभव झाला. तिसरा सामना श्रीलंकेशी विजयी मिळवला. यामुळे ऑस्ट्रेलिया आता पॉईंट्स टेबलमध्ये 8 व्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंका 9 व्या क्रमांकावर आहे. येत्या 6 सामन्यात श्रीलंकेला सर्व सामने जिंकावे लागतील तरच श्रीलंका संघ विश्वचषकात तग धरून उभा राहू शकतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी