29 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरक्रिकेटक्रिकेटपटू कृणाल पांड्याला झाले पुत्ररत्न, ठेवले 'हे' नाव

क्रिकेटपटू कृणाल पांड्याला झाले पुत्ररत्न, ठेवले ‘हे’ नाव

टीम लय भारी 

क्रिकेटपटू कृणाल पांड्याच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कृणालने ही गोड बातमी सोशलमिडीयावर पोस्ट केली असून या पोस्टमध्ये कृणाल, त्याची पत्नी पंखुरी शर्मा आणि बाळासोबचा फोटो शेअर केला आहे. या बातमीनंतर सोशलमीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी कृणालने लहानग्या बाळाचे नाव सुद्धा जाहीर केले आहे.

माॅडेल पंखूरी शर्मा आणि टीम इंडियाचा बॅटसमन कृणाल पांड्या आई – बाबा बनले आहेत. त्यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर आता काका बनला आहे. ही आनंदाची बातमी कृणाल पांड्याने इंस्टाग्रॅमवर शेअर केली आहे.

क्रिकेटपटू कृणाल पांड्याला झाले पुत्ररत्न, ठेवले 'हे' नाव

पोस्टमध्ये बाळाचे नाव  “कवीर कृणाल पांड्या” असे जाहीर करून आई – बाबा आणि चिमुकलं बाळ असा सुंदर फोटो शेअर केला आहे. क्रुणाल पांड्या आणि मॉडेल पंखुरी शर्मा यांनी 27 डिसेंबर 2017 रोजी लग्न केले होते. साधारण पाच वर्षांच्या लग्नानंतर ते आता आई – वडील बनले आहेत. सगळ्याच विशेष म्हणजे पंखुरीला क्रिकेट पाहायला आवडत नाही परंतु कृणाल पांड्याचे सर्व सामने ती न चुकता पाहते

हे सुद्धा वाचा…

संविधानाचं रक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी युवांवर, रोहित पवारांचा तरुणांना सल्ला

‘उलटी काळी बाहुली, टाचण्या टोचून कुंकूवाचा लिंबू’, विद्या चव्हाणांनी सुचवले शिंदेगटाला चिन्ह

नव्या सरकारच्या राज्यात चाललंय तरी काय…? 24 दिवसांत तब्बल 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!