29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeक्रिकेटरिषभ पंतच्या नावाने गिरगाव चौपाटीवर फलक

रिषभ पंतच्या नावाने गिरगाव चौपाटीवर फलक

भारतीय क्रिकेट संघातील युवा यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) मागील डिसेंबर महिन्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या गंभीर दुखापतीतून तो लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे कित्येक चाहते देव पाण्यात बुडवून बसले असतील, पण “अमूल बटर” या कंपनीने तो ठणठणीत व्हावा यासाठी आपल्या नेहमीच्याच भन्नाट अंदाजात त्याला सदिच्छा दिल्या आहेत. गिरगाव चौपाटीवर लावण्यात आलेला हा जाहिरातीचा फलक (Flex on Girgaon Chowpatty) सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

चालू घडामोडींवर आपल्या कल्पक घोषवाक्यांसह मार्मिक भाष्य करणाऱ्या “अमूल बटर” च्या जाहिराती हा नेहमीच कुतूहलाचा विषय बनला आहे. भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतची तब्येत लवकर चांगली होण्यासाठी “अमूल”ने केलेली ही जाहिरात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरली आहे. या जाहिरातीत रुग्णालयातील एका खाटेवर आराम करीत असलेल्या रिषभला परिचारिकेचा गणवेश परिधान केलेली “अमूल गर्ल” लवकर बारा हो… अशी सदिच्छा देत आहे. यासाठी “रिष-अभ जल्द ही ठीक हो जाओ!” अशा अत्यंत कल्पक अशा टॅगलाईनचा वापर करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा 

दुरदर्शन, आकाशवाणीला येणार अच्छे दिन!

‘आता उरलेले उद्योग उत्तर प्रदेशच्या घशात घालण्यासाठी योगींना पायघड्या’

अखेर ईडीने किरीट सोमय्यांचा हट्ट पुरविला !

अमूलने केलेली गिरगाव चौपाटीवरील जाहिरात सर्वांनाच खिळवून ठेवत आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, पुढील काही महिने त्याला क्रिकेटपासून दूरच राहावे लागणार आहे. ३० डिसेंबर रोजी रुडकीतील गुरुकुल नारसन येथे रिषभच्या गाडीला भयंकर अपघात झाला होता. या अपघातातून तो बालंबाल बचावला होता.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी