34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रिकेटHardik Pandya: हार्दिक पांड्या होऊ शकतो T20 क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार

Hardik Pandya: हार्दिक पांड्या होऊ शकतो T20 क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार

2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते अशी शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त केली आहे. टीम इंडियाच्या गेल्या काही स्पर्धांमधील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता बीसीसीआयने नव्या निवड समितीसाठी अर्ज मागवले आहेत. यासोबतच बोर्डाने असेही सांगितले आहे की, नवीन निवड समिती कोण असेल त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधाराची निवड करावी लागेल. रोहित शर्माकडे वन डे आणि कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद कायम राहणार आहे. तर 2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते अशी शक्यता आहे. सध्या हार्दिक पांडे हा न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा टी-20 कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी चांगली झाली तर लवकरच त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

2017 नंतर प्रथमच वेगळे कर्णधारपद
हार्दिक पंड्या ज टी-20 चा कर्णधार झाला तर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्यानंतर टी-20 चा प्रथमच वेगळ्या कर्णधाराचा दौरा होणार आहे. 2017 च्या सुरुवातीला धोनीने ODI-T20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी कसोटीत कोहली आणि मर्यादित षटकांमध्ये धोनी टीम इंडियाचे कर्णधार होता. धोनीने डिसेंबर 2014 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली. त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये स्प्लिट कर्णधारपद बराच काळ राहिले. 2017 ते 2021 पर्यंत विराट कोहली तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार होता. कोहलीनंतर रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार झाला.

हे सुध्दा वाचा

KEM Hospital: केईएम हॉस्पिटल मधील नर्सेस आक्रमक; रुग्णालय प्रशासनविरोधात आंदोलन

10वी 12वीच्या परिक्षांबाबत मोठा निर्णय; वाचा सविस्तर

IND vs NZ : टी20 विश्वचषक संपताच राहुल द्रविडला ब्रेक! व्ही व्ही एस लक्ष्मण प्रशिक्षकपदी विराजमान

हार्दिक पांड्या T20 मध्ये नव्या कर्णधारपदी ?
हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तीन T-20 सामने खेळले आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. हार्दिकने आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्सला त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच चॅम्पियन बनवले. आतापर्यंत 79 T-20 सामने खेळले त्यामध्ये 1117 धावा केल्या. तसेच आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे कर्णधार असताना त्याने 15 सामन्यात 45 च्या सरासरीने 487 धावा केल्या.
2021 च्या T-20 विश्वचषकानंतर हार्दिक पंड्या याने ब्रेक घेतला. त्यानंतर आयपीएलमध्ये शानदार बाजी मारली. त्याने आपला संघ गुजरात टायटन्सला पहिल्याच सत्रात चॅम्पियन बनवले. याशिवाय त्याने आयर्लंड दौऱ्यावर युवा संघाचे नेतृत्वही केले आहे. अशा परिस्थितीत, मिशन 2024 टी-20 विश्वचषक पाहता, हार्दिक पंड्या याला त्याचा संघ पूर्णपणे तयार करण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी