27 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरक्रिकेटशुभमन गिल पाकिस्तानविरोधात मैदानात?

शुभमन गिल पाकिस्तानविरोधात मैदानात?

टीम इंडियाचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज शुभमन गिल आता बरा झाला आहे. शुभमनने डेंग्युवर मात केली आहे. एवढेच नाही तर त्याने आता सरावदेखील सुरू केला आहे. आयसीसी वर्ल्डकप 2023 ला सुरुवात झाली आणि लगेचच शुभमन गिल डेंग्युने आजारी पडल्याची बातमी आली. त्यामुळे टीम इंडियाला धक्का बसलाच शिवाय त्याचे चाहतेही हळहळले होते. चेन्नईतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमनची गैरहजेरी जाणवली. तसेच दिल्लीतील अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यातही सर्वांनी आवर्जन शुभमन गिलची आठवण झाली. आता शुभमनने सराव सुरू केल्यामुळे तो पाकिस्तानशी दोन हात करेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे सर्वाचे लक्ष आता निवड समितीच्या निर्णयाकडे लागलेले आहेत. याबाबत कदाचित शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

आयसीसी वर्ल्डकप 2023 मधील महामुकाबला म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे या लढतीत शुभमन गिल हवाच, अशी चाहत्यांची इच्छा आहे. म्हणूनच की काय डेंग्यूवर मात केलेल्या शुभमन गिलने आता सरावदेखील सुरू केला आहे.


शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी चेन्नईमध्ये गेल्यावर आजारी पडला. त्यानंतर त्याला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र, जिद्दीच्या जोरावर शुभमनने डेंग्यूवर मात केली आहे. बुधवारी, (11 ऑक्टोबर) शुभमन गिल अहमदाबादमध्ये दाखल झाला. त्यानंतरही सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध शुभमन खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. असे असले तरी बीसीसीआयचे वैद्यकीय पथक शुभमनच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहे. शुभमन गिल वर्षभरापासून फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच तो वर्ल्डकपमधील महत्त्वाचे सामने खेळावा, भारताच्या यशात शुभमन गिलचे महत्त्वाचे योगदान असावे, असे त्याच्या चाहत्यांना वाटते. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळणार का, याकडे लागल्या आहेत.

हे ही वाचा 

वर्ल्डकपचा किंग रोहित शर्मा! अफगाणिस्तान विरुद्ध शतक ठोकून तब्बल ‘इतके’ रेकॉर्ड्स केले नावावर

भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यासाठी रेल्वे विभागाकडून क्रिकेट चाहत्यांना आगळीवेगळी भेट

मोदी स्टेडियम बनले सुरक्षा छावणी, लक्ष भारत-पाकिस्तान लढतीकडे

टीम इंडिया आयसीसी वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळली आहे. पहिला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर दुसरा अफगाणिस्तानविरुद्ध. दोन्ही सामने टीम इंडियाने सहजगत्या खिशात घातले. तरीही सर्वांनी शुभमन गिलची वारंवार आठवण येत होती, विशेषता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात. आता पाकिस्तानविरुद्ध सामन्यात शनिवारी शुभमन खेळल्यास टीम इंडियासाठी मोठी जमेची बाजू असेल. त्याचवेळी शुभमन गिलचे कमबॅक झाल्यास कोणत्या खेळाडूला बसावे लागेल, हे शुक्रवारी स्पष्ट होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी