28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रिकेटवनडेमध्ये देखील टीम इंडिया नंबर वन; न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव

वनडेमध्ये देखील टीम इंडिया नंबर वन; न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव

भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील (IND vs NZ 3rd ODI) तिसरा आणि अखेरचा सामना देखील भारतीय संघाने जिंकत भारत आयसीसीच्या एकदिवसीय संघांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे. मंगळवारी (दि.२४) रोजी इंदूर येथील होळकर स्टेडीयमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा तब्बल ९० धावांनी पराभव केला. आता टी-20 संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असून पुढच्या महिन्यात होणारी बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका जिंकल्यास भारतीय संघ जगातील नंबरवन संघ बनू शकतो. (IND vs NZ 3rd ODI Team India number one ODIs; New Zealand lost by 90 runs)

इंदूरमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 385 धावा करत न्यूझीलंड समोर विजयासाठी 386 धावांचे मोठे आव्हान उभे केले. मात्र 42 षटकांमध्ये 295 धावांवर न्यूझीलंडचा संघ गारद झाला. भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्मा, शुभनन गिल यांनी या सामन्यात शतकी खेळी करत मोठी धावसंख्या भारतीय संघाला उभारुन दिली. त्यानंतर हार्दिक पांड्या याने देखील अर्धशतक केले. त्यामुळे भारतीय संघाचा डाव मजबूत झाला.

या सामन्यात भारतीय संघाने 50 षटकांमध्ये 9 गडी बाद 385 इतक्या धावा केल्या. सलामीला आलेल्या शुभमन गिल (112/78) आणि रोहीत शर्मा (101/85) या दोघांनी आपले शतक झळकवले. त्यानंतर विराट कोहली (36/27), इशान किशन (17/24), सुर्यकुमार यादव (14/9) आणि वॉशिंगटन सुंदर (9/14), शार्दुल ठाकुर (25/17) बाद झाले. तर हार्दिक पांड्याने देखील आपले अर्धशतक झळकावले. त्याने 38 चेंडूमध्ये 54 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादव देखील तीन धावा करुन बाद झाला.

दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा संघ फलंदाजीसाठी उतरल्यानंतर हार्दिक पांड्याने सलामीला आलेल्या फिन ऐलेन याला पहिल्याच षटकात शुन्यावर बाद केले. अवघे दोन चेंडू खेळून तो शुन्यावर बाद झाला. त्यानंतर पावरप्ले संपेपर्यंत न्यूझीलंडच्या संघाने एक बाद ७३ धावा केल्या होत्या.

त्यानंतर 15 व्या षटकात कुलदीप यादवमे हेन्री निकल्स याला 42 धावांवर पायचीत केले. यावेळी न्यूझीलंडचा संघ दोन बळी 107 धावांवर खेळत होता. त्यानंतर 24 व्या षटकात कॉन्वेने शतक पूर्ण केले. 25 षटक पूर्ण होईपर्यंत न्यूझीलंडने दोन बाद 184 धावा काढल्या होत्या. 26 व्या षटकात डेरिल मेचेल आणि कर्णधार टॉम लाथमल बाद झाले.

त्यानंतर थोड्याच वेळात शार्दुल ठाकुर याने ग्लेन फिलिप्स याला बाद केले. 30 व्या षटकाच्या अखेरीस न्यूझीलंडने 5 बाद 217 धावा केल्या होत्या. 32 व्या षटकात डेवॉन कॉन्वे झेलबाद झाला. त्यापाठोपाठ कुलदिप यादवने मायकल ब्रेसवेल याला देखील बाद केले. तर 40 व्या षटकात युजवेंद्रने जेकब डफीला पायचीत केले तसेच मिचेश सेंटनर याचा देखील बळी घेत न्यूझीलंडला 295 धावांवर गारद केले.

 

 

हे सुद्धा वाचा

IND vs NZ 3rd ODI : भारतीय संघाचे 386 धावांचे न्यूझीलंड समोर आव्हान

IND vs NZ 3rd ODI : टीम इंडियाच्या सहा विकेट; हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर मैदानावर

IND vs NZ 3rd ODI : भारतीय संघाची नंबर वनकडे वाटचाल; शुभमन, रोहीत शर्मा बाद, दोघांनीही झळकवले शतक

या एकदिसीय मालिकेच्या सुरुवातीला न्यूझीलंडचा संघ क्रमवारीमध्ये टॉपला होता. भारतीय संघाने पहिला सामना जिंकत विजयी घौडदौड सुरु केली. त्यानंतर दुसरा सामना आणि तिसरा सामना देखील भारतीय संघाने आपल्या खिशात घातला. तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला धुळ चारत न्यूझीलंडला क्रमवारीतील पहिल्या स्थानावरुन खाली खेचत टीम इंडिया अव्वलस्थानी पोहचला आहे. भारतीय संघाने आजच्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला धुळ चारत सलग वनडेमध्ये सलग सातवा विजय देखील मिळवला आहे. यापूर्वी भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत श्रीलंकेच्या संघाची अशीच धुळदान उडवून दिली होती. त्याआधी बांगलादेश विरुद्धचा शेवटचा सामना देखील भारतीय संघाने जिंकला होता.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी