29 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरक्रिकेटकाळजाचा ठोका चुकणार, भारत-पाकिस्तान सामना थोड्याच वेळात सुरू होणार

काळजाचा ठोका चुकणार, भारत-पाकिस्तान सामना थोड्याच वेळात सुरू होणार

आयसीसी वनडे विश्वचषक भारत-पाकिस्तान या ऐतिहासिक सामन्याची वाट क्रिकेटप्रेमी पाहत आहेत. हा सामना पाहण्यासाठी भारतच नाही तर जगभरातील चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. यामुळे आज १४ ऑक्टोबरला सर्व क्रिकेट चाहत्यांचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. वनडे क्रिकेट विश्वचषकात भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात आतापर्यंत ७ वेळा लढले आहेत. तर यापैकी ५ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. आजचा होणारा ८ वा सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. १ वाजून ३० मिनिटांनी टॉस करण्यात येणार असून दुपारी २ वाजता या हायव्होल्टेज सामन्यास सुरुवात होणार आहे.

भारतात सुरू असलेल्या वनडे विश्वचषकात भारताने अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दोन्ही सामन्यात विजयी मिळवला आहे. तर दुसर्या बाजूला पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंका विरूद्धच्या दोन्ही सामन्यात विजयी मिळवला आहे. या दोन्ही संघांच्या विजयाचा विचार केल्यास दोन्ही संघ हे बरोबरीचा सामना करत आहेत. मात्र आजच्या सामन्यात कोण कोणावर भारी पडेल हे पाहणे उत्कंठावर्धक असेल. दरम्यान, हा सामना सुरू होण्यापूर्वी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी संगिताचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी गायक सुखविंदर सिंग, अरीजित सिंग, शंकर महादेवन उपस्थित राहणार असून आपल्या सुमधूर संगिताने सामन्याचा शुभारंभ करणार आहेत.


हेही वाचा 

आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश

‘बाकीच्या जागा जिंकता येतील पण बारामती…’ चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

१८०० नागरिकांच्या मृत्यूनंतरही हमास आक्रमक, रशियाची मध्यस्थीची तयारी

दरम्यान, पाकिस्तानातून एक नाही दोन नाही तर तब्बल ६० पत्रकारांनी आजच्या सामन्याचे कव्हरेज करण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली आहे. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तान प्रथमच सामना खेळणार आहे. यामुळे पाकिस्तानला खेळण्यापूर्वी येथील खेळपट्टीचा अंदाज घेऊनच खेळावे लागणार आहे. तर भारताचे होम ग्राऊंड असल्याने भारताला या खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान हाेणारा सामना हा क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच सामना आहे. तर या स्टेडियमवर लाखोंच्या संख्येने ऑडियन्सला बसण्याची व्यवस्था आहे. यामुळे य़ा ठिकाणी चारही बाजूने सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. आता हा सामाना ऑनलाईन स्वरूपात देखील पाहता येणार आहे.

या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पाहता येणार सामना  

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर क्रिकेटप्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होलटेज सामना पाहता येणार आहे. तसेच, सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हॉट-स्टारवर उपलब्ध असेल. यामुळे आता चाहत्यांना ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या पाहू शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी