25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरक्रिकेटहार्दिक पंड्याचा जलवा, पण शिखर धवन मात्र कमनशिबी

हार्दिक पंड्याचा जलवा, पण शिखर धवन मात्र कमनशिबी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात क्राइस्टचर्च येथे खेळवण्यात आलेला तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे या मालिकेत न्यूझीलंड संघाला 1-0 असा विजय मिळाला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात क्राइस्टचर्च येथे खेळवण्यात आलेला तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे या मालिकेत न्यूझीलंड संघाला 1-0 असा विजय मिळाला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने बुधवारी येथे भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 47.3 षटकांत सर्वबाद 219 धावांवर आटोपला. वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 51 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने 49 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 18 षटकांत 1 बाद 104 धावा केल्या होत्या, त्यानंतर पावसाने खेळ थांबवला आणि पुढील खेळ होऊ शकला नाही.

त्याचवेळी सामना रद्द झाल्यानंतर न्यूझीलंडने वनडे मालिका 1-0 अशी खिशात घातली. न्यूझीलंडने पहिला एकदिवसीय सामना सात गडी राखून जिंकला. दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला. टॉम लॅथमला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडण्यात आले. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे आता भारतीय संघावर ताशेरे ओठण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सातत्याने ऋषभ पंतला संधी देण्यात आली आणि तो वेळोवेळी खराब खेळी करत राहिल्याने आता निवडसमितीवरही प्रश्नचिन्हे उपस्थित केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

‘अनिल परब यांनी साई रिसॉर्टप्रकरणी 5 कोटींचा दंड भरला नाही’

ऋषभ पंतचा ‘अपयशाचा फेरा’ संपेना !

नवल : ‘इस्रायलमध्येही विकृत जितेंद्र आव्हाड !’

शिवाय आता ऋषभ पंतच्या जागेवर संघात संजू सॅमसनला संधी देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. याआधीही अनेकदा संजू सॅमसनला संघात स्थान न दिल्याने चाहते नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अनेकांनी संजूला संघात घेण्यात येत नाही यामुळे बीसीसीआयवर टीका देखील केली आहे. विशेष म्हणजे संजूला संघात स्थान देण्याची मागणी केवळ फॅन्स नाही तर माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट जाणकारांकडूनही याआधी अनेकदा केली आहे. मात्र, तरीही त्याला संघात स्थान दिले नाही.

दरम्यान, हा वनडे सामना भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील शेवटचा सामना होता. या दौऱ्यात 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी टी20 मालिकेत भारताने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात विजय मिळवला पण आता वनडे मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वात खेळत असताना संघ पराजित झाल्याने आता शिखर धवनच्या नेतृत्व कौशल्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!