31 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरक्रिकेट'औकात मे रहो पाकिस्तानियो': पाकिस्तानी पत्रकाराने PSLची IPLशी तुलना केल्याने भारतीय क्रिकेट...

‘औकात मे रहो पाकिस्तानियो’: पाकिस्तानी पत्रकाराने PSLची IPLशी तुलना केल्याने भारतीय क्रिकेट चाहते संतापले

पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2023 चा अंतिम सामना रोमांचक आणि रोमहर्षक रीतीने संपला कारण लाहोर कलंदर्सने मुलतान सुलतान्सचा अवघ्या 1 धावाने पराभव केला आणि असे बरेच क्षण होते जेव्हा सामना दोन्ही बाजूने जाऊ शकला असता. नाणेफेक लाहोर कलंदरने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; शेवटचा फलंदाज खुशदिल शाह धावबाद झाल्याने लाहोर कलंदरने मुलतान सुलतान्सला 199 धावांत गुंडाळण्यात यश मिळविले. शाहीन आफ्रिदी याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी (4/51 आणि 44 धावा*) सामनावीर पुरस्कार मिळाला तो देखील PSL दोनदा जिंकणारा पहिला कर्णधार ठरला.

'औकात मे रहो पाकिस्तानियो': पाकिस्तानी पत्रकाराने PSLची IPLशी तुलना केल्याने भारतीय क्रिकेट चाहते संतापले

या दरम्यान पाकिस्तानी क्रिकेट चाहते PSLची IPLशी तुलना करत होते आणि अंतिम सामन्याची रोमांचक समाप्ती होताच, एका पाकिस्तानी पत्रकाराने पुन्हा एकदा ट्विटरवर दोन्ही लीगची तुलना केली. (Indian cricket fans outraged after Pakistani journalist compared PSL to IPL)

'औकात मे रहो पाकिस्तानियो': पाकिस्तानी पत्रकाराने PSLची IPLशी तुलना केल्याने भारतीय क्रिकेट चाहते संतापले

त्याने ट्विट करत लिहिले की, “पक्की खात्री आहे की आयपीएल त्याच्या संपूर्ण अस्तित्वात एकट्या या पीएसएल हंगामासारखा रोमांचक कधीच नव्हता. जगातील सर्वात रोमांचक लीग मिळाल्याबद्दल आम्ही पाकिस्तानी खूप भाग्यवान आहोत.” यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्याला लक्ष्य केले आणि त्याची पळता भुई थोडी केली.

एका भारतीय क्रिकेट चाहतीने लिहिले आहे की, आयपीएल बक्षीस रक्कम 46 कोटी, PSL बक्षीस रक्कम 3.4 कोटी आहे. पाकिस्तानीओ औकातीत रहा.. बाप-बाप होता है..बेटा बेटा..! आयपीएल दरम्यान कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत नाहीत आणि पीएसएलमध्ये केवळ तृतीय श्रेणीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होतात, असे देखील तिने स्पष्ट केले.

निवडलेल्यांपैकी काही ट्विट पहा:

हे सुद्धा वाचा :

क्रिकेटपटू केदार जाधवचे वागणे खेळाला लाथा मारण्यासारखे; शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

कौतुकास्पद : वानखेडेत होणार मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा..!

हरमनप्रीतची जादू! दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची केली बरोबरी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी