Indian Premier League (आयपीएल) या विश्वातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या 16व्या महासंग्रामाला काल शुक्रवारपासून सुरुवात झाली असून आयपीएलचा हा अध्याय दोन महिने रंगणार आहे. पहिल्याच सामन्यात युवा कर्णधार हार्दिक पंड्या अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसमोर असेल. नवीन हंगामातील पहिल्या सामन्यात, GT ने CSK चा पाच गडी राखून पराभव करून विजयी सुरुवात केली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने 179 धावांचे लक्ष्य 19.2 षटकात पाच विकेट गमावून पूर्ण केले आणि सुपर किंग्जवर विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. आयपीएलच्या गेल्या वर्षीच्या आवृत्तीत, जीटीने दोनदा सीएसकेचा सामना केला आणि दोन्ही सामने जिंकले.
आयपीएल 2023च्या अहमदाबाद येथील उद्घाटन समारंभात अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, तमन्ना भाटिया, गायक अरिजित सिंग यांनी मैदानावरील चुरशीच्या स्पर्धेपूर्वी लाईव्ह परफॉर्मन्स दिला. अरिजितने ओपनिंग सेरेमनीमध्ये पहिला परफॉर्मन्स दिला. संपूर्ण स्टेडियम त्याच्या गाण्यांवर नाचले. खुद्द एमएस धोनीही स्वत:ला रोखू शकला नाही. उद्घाटन सोहळा संपल्यानंतर धोनी स्टेजवर गेला. यानंतर काय झाले, सर्वजण पाहतच राहिले.
#IPL2023OpeningCeremony #MSDhoni𓃵 #JioCinema #TamannaahBhatia #RashmikaMandanna #ArijitSinghLive #ArijitSingh MSD was enjoying Arijit’s melodious voice pic.twitter.com/gK3xVpJ3l3
— Memes media (@memes_media09) March 31, 2023
उद्घाटन समारंभाच्या शेवटी, दोन कर्णधार-सीएसकेचा धोनी आणि जीटीचा हार्दिक – देखील विजेत्यांच्या ट्रॉफीसह कलाकार आणि बीसीसीआय अधिकार्यांसमवेत फोटोसाठी मंचावर सामील झाले आणि त्यादरम्यान एक हृदयस्पर्शी क्षण घडला. गायक अरिजितने धोनीसमोर नतमस्तक होऊन त्याच्या पायाला स्पर्श करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्टेजवर येताच अरिजितने धोनीच्या पायाला स्पर्श केला आणि त्यानंतर धोनीने देखील त्याला उचलून मिठी मारली.
हे सुद्धा वाचा :
आजपासून रंगणार ‘आयपीएल’चा महासंग्राम!
कूल कॅप्टनला लागले शेतीचे वेड; एमएस धोनीचा हा अवतार पाहिलात का?
परवेझ मुशर्रफ यांनी महेंद्रसिंग धोनीच्या लांबसडक केसाचे केले होते कौतुक
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर लीगचा पहिला दिवस धोनीच्या बाजूने गेला नाही. त्यांच्या संघाला पहिल्या सामन्यात 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. प्रथम फलंदाजी करताना CSK ने 20 षटकात 7 विकेट गमावत 178 धावा केल्या. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 92 धावा केल्या. धोनी 14 धावांवर नाबाद राहिला. चेन्नईने दिलेले 179 धावांचे लक्ष्य गुजरातने 19.2 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. गुजरातकडून शुभमनने 36 चेंडूत 63 धावा फटकावल्या. तर कर्णधार हार्दिक पंड्याच्या बॅटमधून केवळ 8 धावाच करता आल्या.