34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रिकेटIPL 2023: अर्शदीपची 'स्टम्पतोड' बॉलिंग करतेय लाखोंचे नुकसान!

IPL 2023: अर्शदीपची ‘स्टम्पतोड’ बॉलिंग करतेय लाखोंचे नुकसान!

मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पराभवाने सुरुवात केल्यानंतर आता कुठे शानदार पुनरागमन केले होते. पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इन्डियन्सच्या कालच्या रोमांचक सामन्यात अर्शदीपने टाकलेल्या त्या दोन स्टम्पतोड चेंडूंची चर्चा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. काल रोहित शर्माची टीम पंजाबविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करून वानखेडेवर उतरली. मात्र सामना मुंबई घरच्या मैदानावर असला तरी येथे पंजाबची पगडी कायम राहिली. सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरताना पंजाबचा युवा कर्णधार सॅम कुरनने मुंबईचा षटकार खेचला. त्याचवेळी गोलंदाजीत अर्शदीप सिंगने चॅम्पियन्सच्या तोडून विजय हिसकावून घेतला.

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शनिवारी रंगलेल्या सामन्यात अखेरच्या षटकात मुंबईच्या इंडियन्सच्या संघाला 16 धावांची गरज होती. पंजाबच्या कर्णधाराने चेंडू अर्शदीपकडे सोपवला. त्यानंतर या षटकातील पहिल्या चेंडूवर अर्शदीपने एक धाव दिली. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव फेकला. मात्र, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर अनुक्रमे तिलक वर्मा आणि नेहल वधेराला क्लीन बोल्ड करून सामना पंजाबच्या बाजूने झुकवला. या दोन्ही चेंडूवर अर्शदीपने मुंबईच्या फलंदाजाला क्लीन बोल्ड केले.

मात्र सोशल मिडियावर मात्र अर्शदीपच्या स्टम्पतोड बॉलिंगची चर्चा सुरू आहे. कारण त्याने टाकलेल्या त्या दोन चेंडूंमुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. आयपीएलसाठी वापरण्यात येणाऱ्या एलईडी स्टंपच्या एका सेटची किंमत 25 ते 30 लाख रुपये आहे. त्यामुळे बीसीसीआयला याची मोठी नुकसान भरपाई करावी लागणार आहे. यासह त्याने मुंबईच्या विजयी रथाला ब्रेक लावला आणि आपल्या संघाला 13 धावांनी विजय मिळवून दिला.

हे सुद्धा वाचा : 

रोहितची बॅट तळपली; विराटला मागे टाकत IPL मध्ये केला नवा विक्रम

IPL 2023: लाइव्ह मॅचमध्ये कोहलीची गांगुलीला खुन्नस; हस्तांदोलनही टाळले!

IPL 2023 : ‘या’ चुकीमुळे हार्दिक पांड्याला पडला 12 लाखांचा दंड!

IPL 2023: Arshdeep’s ‘Stumptoad’ bowling loses lakhs; Appreciations poured in on social media, IPL 2023, Arshdeep bowling, IPL 2023: BCCI suffers loss of Rs 20 lakh as Arshdeep Singh breaks two stumps, mumbai indians, punjab kings, cricket, sports

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी