34 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeक्रिकेटIPL 2023: विराट कोहली गौतम गंभीर यांचा हाय व्होल्टेज ड्रामा; व्हिडीओ व्हायरल

IPL 2023: विराट कोहली गौतम गंभीर यांचा हाय व्होल्टेज ड्रामा; व्हिडीओ व्हायरल

विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोन्ही दिल्लीकर पुन्हा एकदा मैदानात भिडल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी 1मे ला लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनौ सुपर जायंट्सचा 18 धावांनी पराभव केला आणि IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आपला 5वा विजय नोंदवला. बेंगळुरू संघाचे सर्व गोलंदाज आणि त्यांचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे या विजयाचे हिरो ठरले. मात्र लखनौच्या फलंदाजीवेळी 17 व्या षटकात विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. जेव्हा विराट स्टेपच्या मागे धावत आला आणि नवीनला काहीतरी इशारा केला, त्यावर नवीनही त्याच्या जवळ आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी आरसीबीचा दिनेश कार्तिक नवीनला आणि अंपायर कोहलीला घेऊन जातो. सामना संपल्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या गोष्टीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

आयपीएल 2023 च्या 43 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने लखनौ सुपरजायंट्सचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान इकाना स्टेडिअमवर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सामन्यादरम्यान आणि नंतर दोन्ही संघांचे काही खेळाडू एकमेकांशी भिडताना दिसले. आरसीबीच्या पराभवानंतर लखनौच्या खेळाडूंकडून केलेल्या जल्लोषावरून वातावरण चांगलेच तापले. सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार राडा झाला. बराच वेळ खडाजंगी झाल्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा:

IPL 2023 : SRH vs DC सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये तुफान हाणामारी; Video Viral

IPL 2023: लाइव्ह मॅचमध्ये कोहलीची गांगुलीला खुन्नस; हस्तांदोलनही टाळले!

IPL 2023: अर्शदीपची ‘स्टम्पतोड’ बॉलिंग करतेय लाखोंचे नुकसान!

IPL 2023, Virat Kohli, Gautam Gambhir, RCB VS LSG, IPL 2023: Virat Kohli Gautam Gambhir High Voltage Drama between RCB VS LSG match

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी