34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रिकेटईशान किशनने रचला इतिहास; डबल सेंच्युरी करुन दिग्गजांचे तोडले रेकॉर्ड

ईशान किशनने रचला इतिहास; डबल सेंच्युरी करुन दिग्गजांचे तोडले रेकॉर्ड

भारत बांग्लादेश क्रिकेट संघाच्या एकदिवसीय सिरीजमधील आजच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारताचा फलंदाज इशान किशन याने दमदार खेळी करत अत्यंत वेगात व्दिशतकी खेळी करत इतिहास रचला आहे.

भारत बांग्लादेश क्रिकेट संघाच्या एकदिवसीय सिरीजमधील आजच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारताचा फलंदाज ईशान किशन याने दमदार खेळी करत अत्यंत वेगात व्दिशतकी खेळी करत इतिहास रचला आहे. ईशान किशनने १२६ चेंडूत द्विशतकी खेळी केली आहे. यात २४ चौकार आणि १० सिक्स देखील मारले. इशान हा एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक खेळी करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

चितगाव येथील जहूर अहमद चौधरी क्रिकेट स्टेडीयमवर भारत विरुद्ध बांग्लादेश सामना सुरू आहे. बांग्लादेशने पहिल्यांचा टॉस जिंकून फिल्डिगचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाने दमदार खेळी सुरू केली. शिखर धवन ओपनिंगला आलेला इशान किशन याने भारतीय संघासाठी मजबूत धावसंख्या उभी केली आहे. इशान याने तुफानी खेळी खेळत अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड मोडीत काढले. इशानने क्रिस गेलचे द्विशतकाचे रॅकॉर्ड देखील मोडीत काढले आहे. गेलने १३८ चेंडूत झिम्बाब्वे विरोधात व्दिशतकी खेळी केली होती. तर इशानने १२६ चेडूंत २१० धावांची खेळी केली आहे.तस्कीन अहमदने ३६ व्या षटकादरम्यान पाचव्या चेंडूला इशानला बाद केले.

हे सुद्धा वाचा
धक्कादायक : कोविडमुळे म्हातारा होतोय मानवी मेंदू; याशिवाय होताहेत ‘हे’ गंभीर परिणाम

ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील गेस्ट लिस्ट आली समोर

सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, रोहीत शर्मा या खेळाडूंनंतर ईशान हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये व्दी शतक ठोकणारा चौथा खेळाडू ठरला आहे. तसेच बांग्लादेशविरोधात एकट्याने दोन शतकांची खेळी करणारा तो खेळाडू ठरला आहे. सर्वात आधी वन डेमध्ये २०० धावांची खेळी करण्याचे रेकॉर्ड सचिन तेंडूलकर याने केले होते. सचिनने दक्षिण आफ्रिकेविरोधात व्दिशतक केले होते, त्यानंतर विरेंद्र सेहवाग, रोहीत शर्मा, मार्टिन गुप्टिल आणि क्रिस गेल यांनी वन डेमध्ये दोन शतकांची खेळी केली होती. इशान किशन शिखर धवन सोबत ओपनिंगला मैदानात उतरला, त्याने आज मैदानात बांग्लादेशला धुवून काढले. इशानने धमाकेदार खेळी करत आपले वन डे मधील पहिले शतक तर केलेच पण याच मैदानावर दोन शतकांची खेळी करुन त्याने इतिहास रचला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी