26 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरक्रिकेटजसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट; भारत-श्रीलंका वनडेआधीच भारतीय संघात कोणते बदल?

जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट; भारत-श्रीलंका वनडेआधीच भारतीय संघात कोणते बदल?

भारत आणि श्रीलंका यांच्यात मंगळवार (दि. १०) रोजीपासून एकदिवसीय मालिका (India-Sri Lanka ODI series) होणार आहे. या या एकदिवसीय मालिकेत तीन सामने खेळले जाणार असून दोन्ही संघ सामन्यांची कसून तयारी करत आहेत. मात्र भारतीय संघासाठी मालिका सुरू होण्यापूर्वीच एक धक्कादायक गोष्ट घडलेली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या एकदिवसीय मालिकेत खेळणार नाही. (Jasprit Bumrah dropped for India-Sri Lanka ODI series )

गुवाहाटी येथे उद्या (दि.१०) रोजी या मालिकेतील पहिला सामना होणार आहे. त्याआधीच बीसीसीआयकडून भारतीय संघात बदल करत जसप्रीत बुमराह याला संघातून वगळण्यात आले आहे. आधी बीसीसीआयने (BCCI) बुमराह यांचा संघात समावेश केला होता मात्र आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर त्याला कोणतीही दुखापत होऊ नये त्यासाठी संघातून वगळ्यात आले आहे. याआधी पाठीच्या दुखण्यामुळे त्याला टी-२० विश्वचषकात खेळता आले नव्हते. त्यामुळे पून्हा दुखापत होऊ नये याची खबरदारी बीसीसीआय ने घेत बुमराह याला भारत श्रीलंका एकदिवसीय मालिकेतून वगळले आहे. जसप्रीत बुमराह हा नोव्हेंबर २०२२ पासून मैदानापासून दूर आहे. याआधी एशिया कप आणि टी-२० वर्ल्ड कपमध्ये देखील तो खेळला नव्हता.
दरम्यान रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू भारतीय संघात आता सहभागी झाले आहेत. याआधी टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये ते भारतीय संघात नव्हते. आता या खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले असले तरी जसप्रीत बुमराह मात्र संघात सहभागी करुन घेतलेले नाही.

दरम्यान भारत श्रीलंका वनडे सीरीजचा पहिला सामना १० जानेवारी रोजी गुवाहाटी येथे दुपारी दीड वाजता होणार आहे. तर दुसरा सामना १२ जानेवारी रोजी कलकत्ता येथे होणार आहे. तसेच मालिकेतील अखेरचा सामना तिरुवनंतपुरम येथे खेळला जाणार आहे. हे तीन ही सामने दुपारी दीड वाजता सुरू होणार आहेत.

असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्नधार), हार्दिक पंड्या (उपउपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, ईशान किशन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमरान मलिक, मोहम्मद सिराज,
श्रीलंकेचा संघ
दासुन शनाका (कर्णधार ), नुवानिडू फर्नांडो, आविष्का फर्नांडो, अशेन बंडारा, पथुम निसंका, धनंजय डिसिल्वा, दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन, डुनिथ वेलालेज, जेफरी वेंडरसे, कासुन राजिथा, लाहिरू कुमारा, महीष तीक्ष्णा, चरित असलंका, चामिका करुणारत्ने, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी