30 C
Mumbai
Tuesday, August 29, 2023
घरक्रिकेटआशिया चषक २०२३: राहूल द्रविडने फोडली मोठी बातमी!

आशिया चषक २०२३: राहूल द्रविडने फोडली मोठी बातमी!

क्रिकेट वर्ल्डकप नंतर आशियातील क्रिकेटची सगळ्यात मोठी स्पर्धा समजली जाणारी आशियाई कप स्पर्धा तोंडावर आली आहे. येत्या २ सप्टेंबरपासून पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने भारताची स्पर्धेची सुरुवात होणार आहे. परंतु त्याअगोदर, भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला असून भारताचा स्टार विकेटकीपर बॅट्समन के. एल. राहुल स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळू शकणार नसल्याचे समजते. भारताचे पहिले दोन सामने ‘अ’ गट मध्ये पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध असून हे गटातील सामने पुढच्या फेरीत जाण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. अश्यात, मधल्या फळीत खेळण्यास के एल राहुल ची उणीव भारतीय संघाला जाणवू शकेल.

काय म्हणाले कोच राहुल द्रविड?

भारतीय क्रिकेट संघाचे कोच राहुल द्रविड यांनी स्पर्धेपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. राहुल द्रविड म्हणाले, “राहुल “खरोखर चांगली प्रगती करत आहे”, परंतु तो पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्धच्या गट-टप्प्याच्या सामन्यांसाठी खेळण्यास उपलब्ध नसेल.” भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना २ सप्टेंबर रोजी असेल तर नेपाळ विरुद्धची लढत ४ सप्टेंबर रोजी होईल. हे दोन्ही सामने पल्लेकेले येथे खेळले जाणार आहेत.

“केएलने आमच्यासोबत येथे चांगला वेळ घालवला. आम्हाला ज्या मार्गावर जायचे आहे त्या मार्गावर तो खरोखरच चांगली प्रगती करत आहे. कँडी येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यांसाठी तो उपलब्ध नसेल,” असे द्रविड म्हणाला.

हे ही वाचा 

नीरजच्या आईने जिंकली करोडो भारतीयांची मनं, पाकिस्तानी खेळाडुबद्दलचं व्यक्तव्य चर्चेत

बांधकाम मजुराची पोरगी गाजवतेय लावणीचा महामंच

छगन भुजबळ हे तेलगी घोटाळ्यात तुरूंगात जाणार होते, पण शरद पवार यांनी वाचविले !

आयपीएल २०२३ दरम्यान के एल राहुल याच्या मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर दुखापतीतून तो पूर्णपणे बरादेखील झाला होता. गेल्या आठवड्यात संघाची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी याला दुजोरा दिला.आशिया चषकासाठी संघाची घोषणा केली तेव्हा विकेटकीपर बॅट्समन म्हणून राहुलला संघात स्थान दिले गेले होते.

पहिल्या दोन सामन्यांसाठी राहुल फिट नसला तरीही नंतर त्यांचे संघात पुनरागमन होणार आहे. याशिवाय, भारताकडे जबरदस्त फॉर्मात आसलेल्या ईशान किशनचा देखील पर्याय उपलब्ध आहे. अन्य राखीव खेळाडू म्हणून संजू सॅमसन देखील संघाबरोबर असेल.

कसा असेल भारतीय संघ?
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा, राखीव खेळाडु संजु सॅमसन.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी