क्रिकेट या खेळाची सुरुवात ही इंग्लंड या देशातून झाली होती. मात्र याची प्रचंड लोकप्रियता ही भारतात पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर क्रिकेट खेळासाठी भारताची चर्चा अधिक होताना दिसते. भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते. यामुळे क्रिकेटला असणारा प्रेक्षकवर्ग हा भारतात अधिक आहे. दरम्यान, काही वर्षांपासून क्रिकेट हा खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळवला जाणार आहे, अशी चर्चा होती. अनेक क्रीडाप्रेमींना क्रिकेट हा खेळ आता ऑलिम्पिक स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. यामुळे आता क्रिकेट प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे.
मुंबई येथे (13 ऑक्टोबर) या दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बैठक घेतली. या बैठकीत क्रिकेटला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले. 2028 च्या लॉस एंजेलिसच्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट हा खेळ खेळवला जाईल. अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी दिली. 1900 सालात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट हा खेळ खेळला गेला होता. आता 128 वर्षानंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटला मान्यता दिली आहे.
Five sports were submitted as additional sports for @LA28 pic.twitter.com/mPLTMFjWs0
— The Olympic Games (@Olympics) October 13, 2023
ऑलिम्पिकमध्ये नव्याने पाच खेळ खेळवण्यात येणार असून त्यात क्रिकेटचा समावेश असल्याचे ऑलिम्पिक संचालकांनी याबाबत बैठकीत सांगितले आहे. 1983 साली ऑलिम्पिकची बैठक झाली होती. त्यानंतर ही बैठक शुक्रवारी झाली आहे. दरम्यान, आयसिसीने लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक समितीसोबत काम केले आहे. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती देखील आयसीसीला घेऊन काम करणार आहे.
हे ही वाचा
मराठ्यांच्या मराठवाड्यातील महाविराट सभेत काय घडणार?
१८०० नागरिकांच्या मृत्यूनंतरही हमास आक्रमक, रशियाची मध्यस्थीची तयारी
‘बाकीच्या जागा जिंकता येतील पण बारामती…’ चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे क्रीडा संचालक किट मॅककोनेल यांनी बैठकीत लॉस एंजेलिस समितीने ऑलिम्पिकचा भाग होऊ शकणाऱ्या पाच खेळांचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. यापूर्वी 1900 सालात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. तर 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटातील टी – 20 स्पर्धा प्रस्तावित केल्या आहेत. यामुळे 2028 ची ऑलिम्पिक स्पर्धा ही लक्षवेधी ठरेल.
महिला क्रिकेट संघांचा समावेश?
महीला-पुरुष गटातील प्रत्येकी सहा संघ 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत असावेत, अशी मागणी आयसीसीने केली आहे. जात 6 संघांचा समावेश असावा. हे 6 संघ आयसीसीतील अव्वल क्रमवारीतील संघ असतील. ही मागणी आयसीसीने ऑलिम्पिक समितीकडे केली आहे. पण यावर अजूनही अधिकृत माहिती दिलेली नाही.