देशात सुरू असलेला वनडे आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचा (One Day ICC Cricket Worldcup) प्रत्येक सामना क्रिकेट रसिकांना काही ना काही देऊन जात आहे. वर्ल्डकप म्हटलं कि सर्वात आधी भारत-पाकिस्तान (India-pakistan) हा सामना केवळ भारताच्या नाही तर जगाच्या दृष्टीकोनातून ऐतिहासिक सामना म्हणून ओळखला जातो. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया हा संघ अधिकच फॉर्ममध्ये खेळत आहेत. टीम इंडियाने सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या ८ ही सामन्यात विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाकिस्तान संघाचा दारूण पराभव केला आहे. एकाही सामन्यात टीम इंडियाचा पराभव न झाल्याने पाकिस्तानचे काही क्रिकेटपटू आणि काही नेटकऱ्यांनी वर्ल्डकपबाबत आक्षेप घेतला आहे.
टीम इंडियाला द. आफ्रिका आणि न्यूझीलंडचे आव्हान होते. मात्र टीम इंडियाने या दोन्ही संघांवर एकहाती विजय मिळवला. तर द.आफ्रिकेला १०० धावांच्या आतच ऑल आऊट केले आहे. तसेच श्रीलंकेला देखील १०० धावांच्या आतच ऑल आऊट केले आहे. यामुळे काही संघांनी टीम इंडिया आणि मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर आक्षेप शंका उपस्थित होत आहेत. मोहम्मद शमी (mohammad Shami) सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये प्रत्येक सामन्यात ४-५ गडी बाद करत आहे. यावर आता पाकिस्तानच्या एका खेळाडूने टीम इंडियाच्या कामगीरीवर संशय व्यक्त केला आहे.
वादाचा फटाका पेटवण्यापेक्षा सलोख्याचा फराळ करा-आमदार कपिल पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आदित्य ठाकरेंच्या ट्विटचा सरकारने घेतला धसका !
बिहारनं करून दाखवलं, महाराष्ट्र कधी करणार?
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर शंका
पाकिस्तानचा खेळाडू हसन रझाने सिराज आणि शमीच्या खेळाबद्दल वक्तव्य केले आहे. हसन रझा म्हणाला की, सिराज आणि शमी ज्याप्रकारे चेंडू स्विंग करत होते, त्यावरून असे वाटते की, दुसऱ्या डावात आयसीसी आणि बीसीसीआय त्यांना वेगळ्या चेंडूंचा बॉक्स पुरवत आहेत. यावर आता शमीने रझाला सोशल मीडियाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाला शमी?
रझाने शमी आणि सिराजच्या खेळीवर आक्षेप घेत क्रिकेट बोर्डाने अधिक थर असलेले चेंडू टीम इंडियाला पुरवले आहेत. यामुळे त्यांचे चेंडू अधिक स्विंग होत आहेत, असे वक्तव्य रझाने केले आहे. यावर आता शमीने रझाला मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. शमी म्हणाला की, मित्रा लाज वाटते, खेळावर लक्ष केंद्रीत कर, अनावश्यक मूर्खपणाकडे नको लक्ष देऊ. इतरांच्या यशाचा आनंद घ्या. हा आयसीसी वर्ल्डकप आहे, कोणतीही साधी लोकल स्पर्धा नाही. वसिम आक्रमने याबाबत आधीही सांगितले होते, मात्र तुमचा आक्रमसारख्या खेळाडूवर विश्वास नाही. असे म्हणत शमीने रझाची शाळा घेतली आहे.