32 C
Mumbai
Monday, March 25, 2024
Homeक्रिकेटभारतासाठी वनडे फॉरमॅटमध्ये मोहम्मद सिराज 'नंबर 1'

भारतासाठी वनडे फॉरमॅटमध्ये मोहम्मद सिराज ‘नंबर 1’

मोहम्मद सिराज या वर्षी भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद सिराजने या वर्षात आतापर्यंत 24 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर युजवेंद्र चहल सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने यजमानांना सुरुवातीचा धक्का दिला. सलामीवीर अनामूल हकला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराज या वर्षी भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद सिराजने या वर्षात आतापर्यंत 23 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर युजवेंद्र चहल सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. युझवेंद्र चहलने 2022 मध्ये आतापर्यंत 21 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे आता सिराज यावर्षी भारताच्या गोलंदाजीतील सर्वात महत्त्वाचा भाग ठरला आहे.

सिराजने यावर्षी वनडेत आतापर्यंत 23 विकेट घेतल्या
आकडेवारीनुसार 2022 मध्ये मोहम्मद सिराजने आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये सर्वाधिक 23 विकेट घेतल्या आहेत. तर युजवेंद्र चहल 21 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर या यादीत प्रसिद्ध कृष्णा तिसऱ्या तर शार्दुल ठाकूर चौथ्या क्रमांकावर आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी 19-19 विकेट घेतल्या आहेत. प्रसिद्ध कृष्णाने 11 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत. तर शार्दुल ठाकूरने 15 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत. अशाप्रकारे, 2022 मध्ये, मोहम्मद सिराज व्यतिरिक्त, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर हे भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारे टॉप-4 गोलंदाज आहेत.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत भाजपची 15 वर्षांची सत्ता कोसळली; आम आदमी पक्षाला मतदारांचा कौल

सीमा वादाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात नेत्यांमध्येच वाद पेटला

UPSC Mainsचा निकाल जाहिर, जाणून घ्या मुलाखतींबाबतची पूर्ण माहिती

सिराजने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 3 बळी घेतले
मात्र, मोहम्मद सिराजचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. याआधी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराजने तीन खेळाडूंना बाद केले होते. मात्र, असे असतानाही टीम इंडियाला पहिल्या वनडेत पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर या मालिकेतील दुसऱ्या वनडेतही त्याने चांगली गोलंदाजी केली.

दरम्यान, सध्या सुरू असलेली वनडे मालिका संपल्यानंतर भारत आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ कसोटी मालिकेत भिडणार आहेत. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवायचा असेल तर या मालिकेत बांग्लादेश ससंघाला क्लीन स्वीप देणे बंधनकारक आहे. त्यामुळे वनडे मालिका 2023 वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाची असली तरीही कसोटी मालिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी