30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरक्रिकेटपाकिस्तानचा विजय पण नेदरलँडच्या या खेळाडूने फोडला घाम

पाकिस्तानचा विजय पण नेदरलँडच्या या खेळाडूने फोडला घाम

काल (ता. 6 ऑक्टोंबर) या दिवशी सुरू असलेल्या वनडे विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड आमने सामने भिडले. यावेळी पाकिस्तानने 286 धावा केल्या होत्या. मात्र नेदरलँडने 205 धावा करत आपलं बस्तान आवरलं. यावेळी पाकिस्तानने एक हाती विजय देखील मिळवला. मात्र अशावेळी विजयापेक्षा नेदरलँडमधील युवा खेळाडूच्या खेळाची चर्चा अधिक पहायला मिळाली आहे. युवा खेळाडूंमध्ये या आधी केवळ दोनदा रेकॉर्ड झाले होते. तोच रेकॉर्ड नेदरलँडचा खेळाडू बास डे लीड या 23 वर्षीय युवा खेळाडूने पुन्हा एकदा केला आहे. यामुळे पाकिस्तानला मिळालेल्या विजयाहून बास डे लीडची चर्चा अधिक पहायला मिळत आहे.

या सामन्यात सुरुवातीला नेदरलँडने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी केली. यावेळी पाकिस्तान हा संघ 38 धावांवर खेळत असताना नेदरलँडने 3 गडी बाद केले. अशावेळी पाकिस्तानचे फलंदाज मोह्ममद रीझवान आणि शकील यांनी 68 धावा देऊन समाधानकारक धावसंख्या उभारली होती. यावेळी नेदरलँडचा खेळाडू बास डे लीड याने 9 षटकात 6 चौकार आणि 2 षटकार लगावत 67 धावा काढल्या. मात्र नेदरलँड संघाला जरीही विजय मिळाला नसला तरीही लीडने या विश्वचषकात विक्रम नोंदवला आहे.

हेही वाचा 

World Cup ची वरात, पुण्याच्या दारात!

Cricket World Cup 2023 थरार रंगणार; टीम इंडियासह इतर देशांच्या संघांची गेल्या चार वर्षांतील कामगिरी कशी होती ?

भारताचे हे स्टार खेळाडू वर्ल्डकपनंतर निवृत्त होणार?

अर्धशतकासह लीडने 4 गडी देखील बाद केले. अर्धशतक करत 4 गडी बाद करणे हा विक्रम याआधी क्रिकेट विश्वात दोनदा पहायला मिळाला होता. सर्वात आधी झिम्बाब्वेच्या डंकन फ्लेचरने 1983 सलात ऑस्ट्रेलिया या संघाविरुद्ध इतिहास रचला होता. तर झिम्बाब्वेच्या केनियाविरुद्ध नील जॉन्सनने 42 धावा देऊन 4 गडी बाद केले होते.

या युवा खेळाडूंनी रचला इतिहास

झिम्बाब्वेच्या डंकन फ्लेचरने 1983 सालात 42 धावा देत 4 गडी बाद केले, 69 धावा करत नाबाद खेळी केली होती.

नील जॉन्सनने केनिया विरुद्ध खेळत 42 धावा देत 4 गडी बाद केले होते. यावेळी त्याने 59 धावांची कामगिरी केली होती.

पाकिस्तान विरुद्ध नेदरलँडच्या बास लीडने 62 धावा देत 4 विकेट्स घेऊन 67 धावा काढत विक्रम केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी