27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरक्रिकेटभारत-पाकिस्तान सामन्यात 'जय श्री राम'चा नारा, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार

भारत-पाकिस्तान सामन्यात ‘जय श्री राम’चा नारा, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार

देशात आयसीसी वनडे वर्ल्डकप सुरू आहे. देशातील वातावरण आनंदी असून भारताने सलग तीन विजय मिळवले आहेत. तर पाकिस्तानने हार पचवत पुढील सामन्याकडे आगेकूच करताना दिसत आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान या सामन्यात भारताने पाकिस्तान संघाला डीवचून हुल्लडबाजी केली असल्याचे म्हणणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आहे. यावर आता पाकिस्तान बोर्डाने याविरुद्ध आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. यावरून आता धुमशान पाहायला मिळत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

भारत-पाकिस्तान या दोन्ही संघात 14 ऑक्टोबरला वनडे वर्ल्डकपचा सामना पार पडला होता. आशा वेळी भारतीयांनी ‘जय श्री राम’, ‘जय श्री राम’ असा नारा केला होता. त्याचप्रमाणे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रसारित होताना दिसत आहेत. यामुळे काही पाकिस्तानी चाहते नाराज आहेत. काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर पाकिस्तानी पत्रकारांना सामना कव्हर करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने व्हिसा मिळावा, असा अर्ज देखील केला होता. मात्र अजूनपर्यंत विसा न मिळाल्याने पाकिस्तान बोर्डाने आयसीसीला भारताविरोधात तक्रार केली आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्री शिंदे समाजवादी संघटनांबद्दल काय म्हणाले?

ड्रग्जमाफिया ललित पाटीलला चेन्नईतून अटक, ड्रग्जच्या रॅकेटचे गूढ उलगडणार?

पाकिस्तानी टीमचा ‘ताप’ का वाढला?

काय होते ट्विट

14 ऑक्टोबरला झालेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तान संघाला डिवचले आहे. पाकिस्तानी पत्रकारांना अजूनही व्हिसा दिला नाही. या सामन्या दरम्यान भारताने पाकिस्तान संघाला टार्गेट केले आहे. अशी तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी