आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आशिया चषक 2023 एकदिवशीय मालिकेसाठी पाकिस्तान (Pakistan) ऐवजी इतरत्र आयोजन करण्याबाबत विचार केला जाण्याची शक्यता आहे. आशियाई चषक 2023 चे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार होते. मात्र ऑक्टोबर 2022 मध्ये जय शहा यांनी भारत या मालिकेसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे जाहीर केले होते. दरम्यान शनिवारी (दि.४) बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांच्यात शनिवारी बहरीन येथे बैठक झाली. त्यामुळे आता आशियाई कप 2023 पाकिस्तान ऐवजी ही मालिका संसुक्त अमिराती अरब (UAE) मध्ये होण्याची शक्यता आहे. (Pakistan likely to lose hosting of Asia Cup 2023)
युएईमधील दुबई, अबुधाबी, शारजाह येथे हे सामने होण्याची शक्यता आहे. मात्र यावर अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) च्या सदस्य देशांच्या प्रमुखांनी या बैठकीला हजेरी लावली. ही बैठक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष नजम सेठी यांनी बोलावली होती. कारण एसीसीने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यात यजमान म्हणून पाकिस्तानचा उल्लेख केलेला नव्हता.
हे सुद्धा वाचा
‘माता रमाई जयंती उत्सव’ शासकीय पातळीवर साजरा करा; सुप्रिया सुळे यांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
आमदार झाल्यानंतर सत्यजित तांबेंची पहिलीच पत्रकार परिषद; नाना पटोले, एच.के. पाटलांवर डागली तोफ
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एसीसी सदस्यांची आज बैठकीत चर्चा झाली. मात्र ही स्पर्धा पाकिस्तानातून इतरत्र स्थलांतरीत करण्याबाबत अंतिम निर्णय आज घेण्यात आलेला नाही. हा निर्णय मार्च महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यांनी असे देखील सांगितले की, भारतीय संघ आशियाई कप 2023 साठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे खेळाडू नसतील तर प्रायोजक स्पर्धेतून माघार घेतील.
तर दुसरीकडे एसीसीच्या एका व्यक्तीने सांगितले की, सेठी हे काही काळापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले आहेत. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटांना तोंड देत असून एसीसीने जरी पाकिस्तानंला आशियाई कप साठी यजमानपदाची संधी दिली तरी या स्पर्धेचे आयोजन करणे पाकिस्तान क्रिकेड बोर्डाला ते तोट्याचे ठरु शकते. पाकिस्तानातील आर्थिक संकट आणि महागाईचा उडालेला आगडोंब पाहता ही स्पर्धा युएईमध्ये घेतल्यास आशियाई क्रिकेट परिषदेतील सर्वच देशांना स्पर्धेच्या उत्पन्नातील वाटा मिळण्याची शक्यता आहे.