26 C
Mumbai
Wednesday, November 29, 2023
घरक्रिकेटपाकिस्तानी टीमचा ‘ताप’ का वाढला?

पाकिस्तानी टीमचा ‘ताप’ का वाढला?

भारतात सध्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप सुरू आहे. सर्व संघ फॉर्ममध्ये असून आपला खेळ दाखवत आहेत. बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान काही सामन्यात अयशस्वी झाले मात्र त्यांनी चांगले कमबॅक केले आहे. मात्र आता पाकिस्तान संघासमोर संकट उभे राहिले आहे. भारत-पाकिस्तान या झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध ७ गडी राखून विजय मिळवला आहे. हे दु:ख पचवता पचवता आता पाकिस्तान आणखी अडचणीचा सामना करत आहे. पाकिस्तानचे ३ खेळडू अजारी पडल्याने आता पाकिस्तानी संघाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. अब्दुल्ला शफिक, शाहिन आफ्रीदी, उसमा मीर यांना ताप आला आहे.

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. भारताच्या विजयानंतर पाकिस्तान संघ हतबल झाला, पाकिस्तानला हार पचली नाही. अशातच आता पाकिस्तानचे तीन खेळाडू अजारी आहे. यामुळे येत्या आगामी सामन्यात  पाकिस्तान संघ आणखी दबावात खेळताना दिसू शकतो. सोमवारी बंगळुरु येथे दाखल झालेला पाकिस्तान संघ आता ऑस्ट्रेलियासोबत आगामी सामना खेळणार आहे. मात्र खेळाडू आजारी पडल्याने सरावाची चिंता आहे. पाकिस्तान संघाचे माध्यम व्यवस्थापक यांनी पाकिस्तान क्रिकेटला कळवले आहे. काही खेळाडू काही दिवसांपासून आजारी आहेत. तर काही खेळाडू हे आजारातून बरे झाले आहेत. जे खेळाडू आजारी आहेत ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत.

हेही वाचा

कल्याणच्या युवतीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; ऑनलाईन टॅक्सी किती सुरक्षित?

२५ वर्षांनंतर काजोल पुन्हा बनली ‘अंजली’!

मराठा आरक्षणावर अजित पवार म्हणाले, ‘दमच निघत नाही’

डेंग्यू आणि कोरोना तपासणी

पाकिस्तानचे काही खेळाडू हे आजारी असल्याने त्यांची डेंग्यू आणि कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. आजारपण वाढले की सातत्याने तपासणी केली जात आहे. आगामी सामना काही तासांवर येऊन ठेपला असून पाकिस्तान संघ सराव करणार नाही. मंगळवारी सायंकाळी ६ ते ८ वाजण्याच्या दरम्यान पाकिस्तान संघातील इतर खेळाडूंच्या सरावासाठीू आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे आजारी खेळाडूंची तपासणी केली जात आहे. या तपासणीनंतर आजारी पाकिस्तानी खेळाडूंना डेंग्यूची लागण झाली आहे की नाही याबाबत अजूनही माहिती समोर आली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी