विजयाचं खातं खोललेल्या बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघ मंगळवारी (10 ऑक्टोबर) या दिवशी वनडे विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेशी सामना करेल. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करून विश्वचषकाची सुरुवात केली होती, तर दिल्लीतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. पाकिस्तान आता दुसरा विजय मिळवण्यासाठी कंबर कसून आहे. तर श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघ पहिल्या विजयाच्या शोधात आहे. वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका संघ आतापर्यंत वनडे विश्वचषकात अनेकदा आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी एकमेकांना चांगलीच टक्कर दिली आहे. यामुळे आजचा सामना कोण विजयी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण कोणावर पडणार भारी?
श्रीलंका आणि पाकिस्तान क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांचा जर विचार केल्यास 156 सामने झाले आहेत. यापैकी 92 सामने हे पाकिस्तान संघाने जिंकले होते. तर त्यातील 59 सामन्यात श्रीलंका संघ पराभवाच्या गर्तेत सापडला होता. तर यंदाच्या वनडे वर्ल्डकपमधील पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या सामन्यांचा विचार केल्यास पाकिस्तानने नेदरलँड्सवर एकहाती विजय मिळवला. तर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला 102 धावांनी मात दिली.पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात आतापर्यंत 8 वेळा सामना झाला आहे, तर पाकिस्तान संघाने 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे पराभूत झाला आहे.
हेही वाचा
क्रिकेट विश्व चषक स्पर्धेतील वेगवान शतक, ‘या’ खेळाडूने केली किमया !
श्यामची आई’ लवकरच प्रदर्शित होणार !
Two action-packed matches lined up 😍 Which teams will secure victory today? 📷 #ENGvBAN | #PAKvSL | #CWC23 #ICCWorldCup2023 pic.twitter.com/TOOiunYFYP
— ICC Cricket World Cup 🏆 (@ICCWorldCupIN) October 10, 2023
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
पाकिस्तान आणि श्रीलंका संघ भारतात 7 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत श्रीलंकेने 4 तर पाकिस्तानने 3 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत भारतात झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर श्रीलंका वरचढ पहायला मिळत आहे. जचा सामना कोण विजयी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.