30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरक्रिकेटअखेर पाकिस्तानी संघाला भारतात क्रिकेट खेळण्याची परवानगी; गृहमंत्रालयाने मंजूर केला व्हिसा !

अखेर पाकिस्तानी संघाला भारतात क्रिकेट खेळण्याची परवानगी; गृहमंत्रालयाने मंजूर केला व्हिसा !

आता सर्व क्रिडाप्रेमी आणि खासकरून क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षक बातमी समोर आली आहे. 2022मध्ये भारतात होणार्‍या ब्लाइंड टीम टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतात येण्यासाठी व्हिसा संबंधित परवानगी मिळाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तान अंध क्रिकेट संघाच्या 34 खेळाडू आणि अधिकाऱ्यांना व्हिसा देण्यास मान्यता दिली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतल ताणलेल्या संबंधांमुळे खेळाडूंची वणवण झाल्याचे पाहायला मिळत असते. दोन्ही देशांतील परिस्थितीतीमुळे काही वर्षांपासून भारताचा कोणताही संघ पाकिस्तानात किंवा पाकिस्तानचा कोणताही संघ भारतात येऊन खेळखेळू शकलेला नाही. अशांतच आता सर्व क्रिडाप्रेमी आणि खासकरून क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षक बातमी समोर आली आहे. 2022मध्ये भारतात होणार्‍या ब्लाइंड टीम टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतात येण्यासाठी व्हिसा संबंधित परवानगी मिळाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तान अंध क्रिकेट संघाच्या 34 खेळाडू आणि अधिकाऱ्यांना व्हिसा देण्यास मान्यता दिली आहे. आता परराष्ट्र मंत्रालय संघाला व्हिसा देऊ शकणार आहे.

खरं तर, याआधीही भारताने पाकिस्तानच्या अंध क्रिकेट संघाला भारतात येण्यासाठी व्हिसा देण्यास नकार दिला होता. याबाबत भारतीय अंध क्रिकेट महासंघाने पाकिस्तानचा व्हिसा नाकारल्याचे सांगितले होते. ते विश्वचषकात सहभागी होण्यासाठी येत नाहीत. त्याचवेळी यानंतर पाकिस्तानने याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिलने असे म्हटले होते की खेळ हा प्रादेशिक राजकारणापेक्षा वरचा असावा आणि मेगा स्पोर्टिंग इव्हेंटमध्ये विशेष दिव्यांग व्यक्तींना योग्य वागणूक दिली जावी.

हे सुद्धा वाचा

मुंबईत आणखी एका अश्लील चित्रपटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

ऑलम्पिक चॅम्पियनचा पराभव कर मीराबाई चानूने रचला इतिहास

पुढील 24 तासांत परिस्थितीत सुधारली नाही तर…; कर्नाटक सीमाप्रश्नावर शरद पवार आक्रमक

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 34 सदस्यीय पाकिस्तानच्या तुकडीला व्हिसा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. व्हिसा देणे हे गृहमंत्रालयाचे काम नाही. आता संबंधित विभाग व्हिसा देऊ शकणार आहे. त्याचवेळी भारतीय अंध क्रिकेट महासंघाचे अध्यक्ष जीके महांतेश यांनी ट्विट केले की ही चांगली बातमी आहे आणि पाकिस्तान अंध क्रिकेट संघ लवकरच आमच्यात सामील होईल अशी अपेक्षा आहे. त्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार मानले. त्याचवेळी, रात्री उशिरापर्यंत पाकिस्तानी मीडियाने दावा केला की भारतीय गृह मंत्रालयाने आधीच परवानगी दिली आहे, परंतु परराष्ट्र मंत्रालयाने राजकीय कारणांमुळे अद्याप व्हिसा जारी केलेला नाही.

विशेष म्हणजे ही स्पर्धा भारतात 5 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत आयोजित केली जात आहे. ज्यामध्ये भारतासोबतच पाकिस्तानचा संघही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. गतवेळी ब्लाइंड टीम टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान उपविजेता ठरला होता. दुसरीकडे, भारतीय संघाने पहिल्या सामन्यात नेपाळचा 274 धावांनी पराभव करत स्पर्धेत शानदार सुरुवात केली.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!