30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeक्रिकेटइंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान पाकिस्तानच्या स्टार खेळाडूची निवृत्ती

इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान पाकिस्तानच्या स्टार खेळाडूची निवृत्ती

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सध्या तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज अझहर अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कराचीमध्ये तो इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सध्या तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज अझहर अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कराचीमध्ये तो इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे.

अझहर अलीने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली
पाकिस्तानचा स्टार फलंदाज अझहर अलीने एक मोठा निर्णय घेतला असून, त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वास्तविक, अझरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कराचीमध्ये तो इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. कसोटीतून निवृत्तीची घोषणा करताना अझहर म्हणाला की आपल्या देशासाठी सर्वोच्च स्तरावर खेळणे हा त्याच्यासाठी सन्मान आणि विशेषाधिकार आहे. कोणत्या दिवशी निवृत्त होणार हे सांगणे फार कठीण आहे. पण सखोल विचार केल्यावर माझ्या लक्षात आले की माझ्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या भूमिपुत्राने 35 हजार कोटींची केलेली गुंतवणूक कौतुकास्पद !

ममता कुलकर्णी ड्रग्स प्रकरणाची कागदपत्रे झाली गहाळ

संभाजी महाराजांना दुर्लक्षित करणाऱ्या ‘कालनिर्णय’ला उशिराने सुचले शहाणपण !

अझर अलीची क्रिकेट कारकीर्द
पाकिस्तानचा स्टार फलंदाज अझहर अलीने पाकिस्तान संघासाठी 96 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 42.5 च्या प्रभावी सरासरीने 7097 धावा केल्या आहेत. अझहरने कसोटीत 19 शतके आणि 35 अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर त्याने ३ वेळा कसोटी सामन्यात द्विशतक ठोकले आहे. अझहरने पाकिस्तानसाठी एकदा त्रिशतकही ठोकले आहे.

कसोटीशिवाय अझहरने पाकिस्तानकडून एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. त्याने 53 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने 3 शतके आणि 12 अर्धशतके केली आहेत. त्याच्या वनडेत 1845 धावा आहेत. अजहर अली हा पाकिस्तान कसोटी संघाचा महान फलंदाज मानला जातो. हे त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर अनेकदा सिद्धही केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी