भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. आजच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी भारतीय संघाने 306 धावांची मोठी धावसंख्या उभारली. ही दुसरी बाब आहे की आज भारतीय गोलंदाजांना आपला उत्कृष्ट खेळ दाखवता आला नाही.
एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघ आता वनडे मालिकेत 0-1 ने मागे पडला आहे. मात्र या मालिकेचे अजून दोन सामने बाकी असून कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुनरागमन करू शकते. आजच्या सामन्यात ही शिखरने उत्तम कामगिरी करत सामन्याची दमदार अशी सुरुवात केली. शिखर सोबतचं शुभमन गिल आणि त्याच्या पाठोपाठ आलेल्या श्रेयस अय्यरनेही चांगली फलंदाजी केली. दरम्यान, भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिखर धवनचे कौतुक केले आहे.
रवी शास्त्री म्हणाले, शिखर धवनची प्रशंसा होत नाही
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वाटते की लोकांकडून केवळ विराट कोहली किंवा इतर प्रसिद्ध खेळाडूंचेच कौतुक होते. तर शिखर धवन सारखा खेळाडू चांगली कामगिरी करूनही त्याला योग्य ते कौतुक होत नाही. ज्याचा तो हक्कदार आहे. ब्रॉडकास्टर प्राइम व्हिडिओवर मुलाखात देताना ते असे म्हणाले. न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने 77 चेंडूत 72 धावांची खेळी केली आणि शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली.
शिखर धवनची वनडे क्रिकेटमधील आकडेवारी उत्कृष्ट आहे
रवी शास्त्री म्हणाले की, खरे सांगायचे तर स्पॉटलाइटचे लक्ष माजी कर्णधार विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर जास्त आहे. पण जर तुम्ही शिखरचा वनडे क्रिकेटमधील विक्रम पाहिला तर तुम्हाला असे अनेक डाव सापडतील ज्यात त्याने मोठमो़ठ्या संघांविरुद्ध चांगली पारी खेळली आहे, जे एक मोठे विक्रम आहे.
हे सुद्धा वाचा
Ind vs NZ : 307 धावांचा डोंगर रचला; पण या क्षणाला सामना गमावला
शिखर धवनच्या नेतृत्त्वात होणार ‘वन-डे’चा महासंग्राम
नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितली ‘सिक्रेड गेम्स’च्या पडद्यामागची गोष्ट
शिखर धवन हा अनुभवी खेळाडू आहे
रवी शास्त्री यांनी शिखर धवनला त्याच्या सुरुवातीच्या काळात ‘बंदूकधारी’ अशी उपादी दिली आहे. शास्त्री म्हणाले की भारतीय संघात अनेक प्रतिभावान युवा खेळाडू आहेत, पण मला वाटते की खेळाच्या या फॉरमॅटमध्ये शिखर धवनचा अनुभव खूप महत्त्वाचा असेल. शिखर धवनच्या आतापर्यंतरच्या सर्व वनडे सामण्यात 6500 हून अधिक धावा आहेत. आणि धवने संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ नाही, त्याने यापूर्वीही भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे ज्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध 2-1, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2-1 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 3-0 असे चांगले निकाल मिळवले आहेत.