30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeक्रिकेटऋतुराज गायकवाडच्या घरी लगीनघाई ? जाणुन घ्या त्याच्या होणाऱ्या पत्नीविषयी

ऋतुराज गायकवाडच्या घरी लगीनघाई ? जाणुन घ्या त्याच्या होणाऱ्या पत्नीविषयी

 

नुकताच आयपीएल २०२३ चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळला गेला. हा सामना रविवारी खेळला जाणार होता. मात्र सामनाच्या वेळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यानंतर हा सामना सोमवारी खेळला गेला. अंतिम सामान्यात रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

दरम्यान आता ऋतुराज गायकवाड लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगत आहे. ऋतुराज गायकवाड ३ किंवा ४ जूनला लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे.
ऋतुराज गायकवाड हा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. ऋतुराज गायकवाडची विकेट घेणारी मुलगी आहे तरी कोण हे अद्याप ही कळले नाही. मात्र ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार हे एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करतात. चेन्नई सुपर किंग्ज संघाची जर्सी घातलेली ही मुलगी उत्कर्षा असल्याचे दिसल्याचे दिसून येत आहे. या कपलने फोटोशूट केलं आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋतुराज गायकवाड प्रमाणेच उत्कर्षा देखील क्रिकेटपटू आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु होण्यापूर्वी ऋतुराज गायकवाड विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा होत आहे. ऋतुराज गायकवाडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून माघार घेतली असून त्याच्या ऐवजी यशस्वी जयस्वालला राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी