30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरक्रिकेटवर्ल्डकपचा किंग रोहित शर्मा! अफगाणिस्तान विरुद्ध शतक ठोकून तब्बल 'इतके' रेकॉर्ड्स केले...

वर्ल्डकपचा किंग रोहित शर्मा! अफगाणिस्तान विरुद्ध शतक ठोकून तब्बल ‘इतके’ रेकॉर्ड्स केले नावावर

वर्ल्ड कप आणि रोहित शर्मा यांचे एक वेगळेच नाते आहे हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काल बुधवारी, (11 ऑक्टोबर) झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने 8 विकेट्सने सहज विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माच्या तुफानी शतकाने भारताला सहजपणे विजय मिळवता आला. हिटमॅनने आपल्या वर्ल्ड कप कारकीर्दीतील 7 वे शतक ठोकले असून या शतकामुळे रोहित शर्मा वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज बनला आहे. रोहितच्या अद्भुत खेळीमुळे त्याने वेगवेगळ्या विक्रमांना गवसणी घातली असून भारताच्या वर्ल्ड कप विजयाच्या घोडदौडीत अजून एका विजयाने सुरुच ठेवली आहे.

वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक शतके

वर्ल्ड कप मध्ये एक अनोखा विक्रम करून ‘हिटमॅन’ रोहित शर्माने आपल्या वर्ल्ड कप कारकीर्दीतील 7 वे शतक ठोकले आहे. यंदाचा वर्ल्ड कप हा रोहितच्या कारकीर्दीतील तिसरा वर्ल्ड कप असून 2015 मधील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे झालेल्या बांगलादेश विरुद्ध त्याने पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर, 2019 मधील इंग्लंडला झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितने तब्बल 5 संघांविरुद्ध शतक ठोकून एक नवा विश्वविक्रम केला होता. रोहितने त्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका विरुद्ध शतके ठोकली. 2019 वर्ल्ड कप मधील 5 शतकांमुळे रोहितने सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड कप मधील 6 शतकांची बरोबरी केली. आणि आता 2023 मधील अफगाणिस्तान विरुद्धच्या या शतकामुळे रोहित शर्मा वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज बनला आहे. रोहितने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड कपमधील 6 शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.


रोहित शर्माची वर्ल्ड कप शतके

शतक | संघ                | धावा   | चेंडू     |  निकाल | वर्ष       |  स्थळ
1     | बांगलादेश         | 137   | 126   |    विजय | 2015   |  मेलबर्न
2     | दक्षिण आफ्रिका   | 122* | 144   |    विजय | 2019   |  साऊथॅम्पटन
3     | पाकिस्तान         | 140   | 113   |    विजय | 2019   |  मॅंचेस्टर
4     | इंग्लंड              | 102   | 109   |   पराभव | 2019  |   बरमिंघम
5     | बांगलादेश         | 104   | 92     |    विजय | 2019   |  बरमिंघम
6     | श्रीलंका            | 103   | 94     |    विजय | 2019   |  लिड्स
7     | अफगाणिस्तान    | 131   | 84     |    विजय | 2019   |   दिल्ली

वन डे मधील सर्वाधिक शतकांमध्ये तिसऱ्या स्थानी

रोहितच्या वनडे कारकीर्दीतील हे 31 वे शतक असून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजां मध्ये अंत तो तिसऱ्या स्थानी आला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगला मागे टाकत या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकार पहिल्या स्थानी असून विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. रोहितच्या शतकामुळे सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांमध्ये पहिल्या तीन स्थानांवर आता भारतीय फलंदाज आहेत.


वनडे क्रिकेट मधील सर्वाधिक शतके करणारे टॉप 5 खेळाडू

1. सचिन तेंडुलकार (भारत) – 49 शतके
2. विराट कोहली (भारत) – 47 शतके
3. रोहित शर्मा (भरत) – 31 शतके
4. रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – 30 शतके
5. सनाथ जयसूर्या (श्रीलंका) – 28 शतके

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सर

रोहितने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 5 षटकार लगावले. या शतकरांसाह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल आला आयाहे. त्याने वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलला मागे टाकत हा विक्रम आपल्या नवे केला आहे. रोहितने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 556 षटकार ठोकले आहेत.


सर्वाधिक षटकार मारणारे टॉप 5 खेळाडू

1. रोहित शर्मा – 556 षटकार
2. क्रिस गेल – 553 षटकार
3. शाहिद अफरीदी – 476 षटकार
4. ब्रॅंडन मॅककुलम – 398 षटकार
5. मार्टिन गुप्टील – 383 षटकार

यासह वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक जलद हजार धावा करणाऱ्या खेळाडुंमध्येही रोहित अव्वल आला असून वर्ल्डकंपमधील फक्त 19 डावांमध्ये त्याने 1000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.’

हे ही वाचा 

भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यासाठी रेल्वे विभागाकडून क्रिकेट चाहत्यांना आगळीवेगळी भेट

पाकिस्तानकडून श्रीलंकेचा दारुण पराभव; 345 धावसंख्येचा पाठलाग यशस्वी

शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार?

असा झाला भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्ताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने 50 षटकांत 8 विकेट्स च्या मोबदल्यात 272 धावा काढल्या. अफगाणिस्तान कडून कर्णधार हशमातुल्लाह शाहिदी याच्या 80 धावांच्या अर्धशतकी खेळीने तसेच अजमातुल्लाह ओमारझाई याच्या 62 धावांच्या अर्धशतकी खेळीमुळे अफगाणिस्तानला एका मजबूत स्थितीत आणले. जसपरित बूमराहने उत्कृष्ट गोलंदाजी करत 10 षटकांत 39 धावा देत 4 विकेट्स मिळवल्या. वर्ल्ड कप मधील ही त्यांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती. त्याला हार्दिक पांड्याने 2 विकेट्स मिळवून उत्तम साथ दिली.


त्यानंतर, 273 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामी जोडीने जबरदस्त खेळ खेळत पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ खेळून आणि इशान किशनने संयमी फलंदाजी करत भारताला एक मजबूत स्थितीत आणले. रोहितने 5 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने 84 चेंडूत 131 धावांची शतकी खेळी केली. तयार ईशान किशनने 2 षटकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 47 चेंडूत 47 धावा काढल्या. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीनेदेखील अर्धशतक झळकाऊन भारताला विजय मिळवून दिला. विराटने 6 चौकरांच्या मदतीने 56 चेंडूत 55 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून राशीद खानने 8 षटकांत 57 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या.

आता भारताचा पुढील सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध शनिवारी, 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी