33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रिकेटSachin Tendulkar Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 50 नाबाद!

Sachin Tendulkar Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 50 नाबाद!

वयाच्या 50व्या नाबाद कामगिरीसाठी मुंबई इंडियन्सतर्फे तयार करण्यात आलेल्या वानखेडे येथील सोहळ्याची विशेष झलक.

आज आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 50वा वाढदिवस. सचिनला क्रिकेटचा देव म्हटले जाते. त्याच्या स्फोटक फलंदाजीचे सर्वांनाच वेड लावेल आहे. त्यांची कारकीर्द 24 वर्षांची होती. 1989 मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले. तर त्याने 2013 मध्ये त्याने शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.

24 एप्रिल रोजी वाढदिवस असून त्याने आपल्या वयाची पन्नाशी गाठली आहे. तर त्याच्या या वाढदिवसाला त्याच्या मुलाने अर्जुन तेंडुलकरने IPL मधून सुरूवात करून त्याला एक प्रकारचे गिफ्टच दिल्याचे अनेकांनी म्हटलं आहे. सचिन वयाच्या हाफसेंच्युरीत असूनही त्याचे वय दिसून येत नाही. आज आपण सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट विश्वातल्या 5 अशा विक्रमांबद्दल माहिती घेऊया, जे कोणत्याही खेळाडूसाठी तोडणे जवळजवळ अशक्यच आहे.

With Tears In Eyes, Sachin Does The Lap Of Honour | Cricket News – India TVआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने कसोटीत सर्वाधिक 15921 धावा आणि एकदिवसीय प्रकारात 18426 धावा केल्या आहेत. कोणत्याही खेळाडूसाठी इतक्या धावा करणे सोपे नसते. त्याची कसोटीत सरासरी 53.78 आणि वनडेत 44.83 आहे.

World Cup Heroes: Sachin Tendulkar's 98 destroys Pakistan brutally and beautifully | CricketSoccer

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके (कसोटीमध्ये 51 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 49) झळकावली आहेत. त्याच्यानंतर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 74 शतके झळकावली आहेत.

Sachin Tendulkar 50th Birthday: The A to Z of world's biggest cricket legend | Cricket News

सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 62 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकला आहे. त्याचबरोबर त्याने कसोटीत 14 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावला आहे. अशाप्रकारे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 76 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला आहे.

Sachin Tendulkar holds most number of 'Man of the Matches' in the World Cup

सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या. जे एका विश्वचषकात कोणत्याही खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. हा विक्रम गाठणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे असणार नाही.

Sachin Tendulkar Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 50 नाबाद!

सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 शतके (सर्व तीन फॉरमॅट) केली आहेत. जे कोणत्याही संघाविरुद्ध फलंदाजाने झळकावलेले सर्वाधिक शतक आहे. त्याच्या खालोखाल डॉन ब्रॅडमन यांचा क्रमांक लागतो, ज्यांनी इंग्लंडविरुद्ध 19 शतके झळकावली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

हे सुद्धा वाचा: 

कौतुकास्पद : वानखेडेत होणार मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा..!

तेजस ठाकरे यांची तुलना सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्याशी केली असती तर

IPLच्या सामन्यांचे द्विशतक करणारा धोनी पहिला कर्णधार!

Sachin Tendulkar, Master blaster Sachin Tendulkar’s 50 not out!, Sachin Tendulkar Birthday, cricket, sports

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी