34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रिकेटआयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक महाग ठरला सॅम करण; 18.50 कोटींची लागली बोली

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक महाग ठरला सॅम करण; 18.50 कोटींची लागली बोली

इंडियन प्रिमियर लीग (IPL) 2023 साठी कोच्ची येथे आज लिलाव प्रक्रीया सुरू आहे. आयपीएलच्या दहा संघांसाठी आज मातब्बर खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी मोठी चढाओढ पहायला मिळाली. आजच्या लिलावात पंजाब किंग्जने सॅम करण (Sam Karan) या खेळाडूला आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लावत 18.50 कोटींची बोली लावत खरेदी केले. तर सनराईज हैदराबादने इंग्लडच्या हॅरी ब्रुक याला 13.25 कोटी रुपयांची बोली लावत संघात सामील करुन घेतले.

आजच्या लिलाव प्रक्रीयेत 405 खेळाडूंवर बोली लावली जात आहे. बोली लावणाऱ्या संघांमध्ये सर्वाधिक पैसा आहे तर सर्वात कमी पैसा केकेआर या संघाकडे आहेत. आयपीएलच्या संघांकडे जास्तीजास्त 87 जागा खाली आहेत.
आयपीएल 2023 च्या 16 व्या सीझनमध्ये एकुन 10 संघ आपल्या टीममध्ये 18 ते 25 खेळाडूंना घेऊ शकतात. ज्यामध्ये 8 विदेशी खेळाडू असू शकतात. या लिलावात न्यूझिलंडचा कॅप्टन केन विल्यमसन देखील आहे. केनची बेस प्राईस दोन कोटी होती. तर भारताचा मयांक अगरवाल याच्यावर सनराईज हैदराबादने मोठी बोली लावत 8.25 कोटी रुपयांना खरेदी केले.आयपीएलच्या लिलाव प्रक्रीयेत अफगानिस्तानचा 15 वर्षीय खेळाडू अल्लाह मोहम्मद हा सर्वात तरुण खेळाडू असून त्याची बेस प्राईस 20 लाख रुपये होती. तर आयपीएलमध्ये हॅट्रीक केलेले 40 वर्षीय अमित मिश्रा हा वयाने सर्वात मोठा खेळाडू ठरला आहे.
हे सुद्धा वाचा

जगभरात कोरोनाचा उद्रेक; विमानतळावर घेणार खबरदारी

गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या कन्या म्हणतात, “गावातीलच काही लोकांच्या चुकीच्या प्रपोगांडामुळे पराभव!”

एकनाथ शिंदे यांचा खोटारडेपणा; अंबादास दानवे यांचा आरोप

काही खेळाडूंना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. यामध्ये 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सने ख्रिस मॉरिसला 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले. 2015 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने युवराज सिंगला 16 कोटींना खरेदी केले होते. दिनेश कार्तिकला आरसीबीने 2019 मध्ये 10.5 कोटी रुपयांना खरेदी केले होते. वरुण चक्रवर्तीला 2020 मध्ये पंजाब किंग्जने 8.4 कोटींना विकत घेतले होते, शिमरॉन हेटमायरला 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 7.75 कोटींना खरेदी केले होते, 2021 मध्ये झी रिचर्डसनला पंजाब किंग्जने 14 कोटींना खरेदी केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी