देशात सध्या वनडे विश्वचषकाचे वारे वाहत आहे. यामुळे क्रिकेट रसिक दररोज क्रिकेट संघाचा आनंद घेत आहेत. यंदाच्या विश्वचषकात कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. काल नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवला आहे. सुरुवातीला श्रीलंकेने टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय श्रीलंकेच्याच अंगाशी आला. या सामन्यात डी कॉक, डुसेन आणि मार्करम यांनी शतकी खेळी केली. एवढंच नाही तर या सामन्यात मार्करम हा वेगाने शतक करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने एबी डीव्हीलियर्सचा रेकॉर्ड मोडला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने 100 धावा, डुसेन 108 धावा आणि मार्करमने 106 धावा करत या शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 5 बाद 428 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 326 धावांत ऑल आऊट झाला. अशावेळी आफ्रिकेने हा सामना 102 धावांनी विजयी मिळवला आहे. या सामन्यात वेगवान शतक करणारा फलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या मार्करमचं नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवलं आहे.
Aiden Markram rewrites the history books 🙌
More records 👉 https://t.co/erGfF3FYFW pic.twitter.com/oBhSaZZ8d7
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 8, 2023
क्रिकेट विश्व चषक स्पर्धेतील वेगवान शतक, ‘या’ खेळाडूने केली किमया !
शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने वर्ल्ड कप खेळणार का? राहुल द्रविडने स्पष्ट सांगितले..
वर्ल्ड कप 2023 अपडेट्स: जाणून घ्या क्रिकेटच्या ताज्या अपडेट्स!
वेगवान शतक ठोकणारा फलंदाज मार्करम
मार्करमने अवघ्या 54 चेंडूत 106 धावा केल्या आहेत. यात 14 चौकार आणि 3 षटकार लगावत पुन्हा तो तंबुत परतला. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलीयर्सने देखील 52 चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम केला होता. मात्र आता तो विक्रम मार्करमने मोडीत काढला. तिसऱ्या क्रमांकावर असलेला डिव्हिलीयर्स चौथ्या क्रमांकावर गेला आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अधिक सामने जिंकले आहेत.
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिकेने जिंकले अधिक सामने
आतापर्यंत श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सात सामने झाले आहेत. यात श्रीलंकेने 1 सामना जिंकला तर 1 सामना बरोबरीने सुटला. तर उर्वरित 5 सामन्यांवर दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरच्या मैदानाचा किंवा पिचचा अंदाज कमी असूनही दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात आगेकूच केली.