30 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरक्रिकेटहार्दिक आणि शार्दुल धरमशालामधून 'आऊट'?

हार्दिक आणि शार्दुल धरमशालामधून ‘आऊट’?

भारतात सध्या आयसीसी क्रिकेट वनडे विश्वचषक सुरू आहे. क्रिकेट चाहते देखील याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. एवढेच नाही तर भारताने पाकिस्तानचे केलेले स्वागत हे पाकिस्तान संघासाठी अवस्मरणीय असेल. यामुळे २०२३ चा आयसीसी वनडे विश्वचषक हा सर्वांसाठी लक्षवेधी ठरत आहे. या विश्वचषकात भारताने चांगली कामगीरी केली आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल आजारी असल्याने तो खेळला नव्हता. मात्र आता त्याचे पुनरागमन झाले. तर दुसऱ्या बाजूला हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकुर भारत विरूद्ध न्यूझीलंडच्या आगामी सामन्यात खेळणार नसल्याची माहिती कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी दिली आहे.

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही दिग्गज संघांदरम्यान वनडे विश्वचषकातील आगामी सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतातील ११ खेळाडूंमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. या सामन्यात खेळणाऱ्या ११ खेळाडूंची नावे आली आहेत. या ११ खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकुरचा समावेश नसल्याची माहिती शशी थरूर यांनी दिली आहे. आगामी भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात हार्दिक पांड्याची जागा घेणारा संघात एकही अष्टपैलू खेळाडू नसल्याचे थरूर म्हणाले आहेत.

हेही वाचा 

‘मराठा-कुणबी’ संदर्भात काय बोलले रामदास कदम?

इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेने उचलले मदतीचे पाऊल

जरांगे-पाटलांबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर….

काय म्हणाले थरूर

धरमशाला येथे होणारऱ्या भारत आणि न्यूझीलंडच्या  सामन्यात भारताचा खेळाडू हार्दिक पांड्या हा दुखापतग्रस्त असल्याने खेळणार नाही. त्याच्या जागी दुसऱ्याला खेळवणे असा कोणताही प्लेअर नाही. यावेळी त्यांनी शार्दुल ठाकुरला देखील विश्रांती देण्यात येणार असून या दोन खेळाडूंऐवजी सुर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांना खेळवण्यासाठी संधी मिळावी. तर त्यांनी शार्दुलच्या जागी मोहम्मद शमी आणि पांड्याच्या जागी सुर्यकुमार यादवला संधी मिळावी, यामुळे या सामन्यात आपण आपले सर्वोत्तम ११ खेळाडू खेळणे गरजेचे आहे. असे मत शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे.

शशी थरुर यांच्या मते ११ खेळाडू 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी