29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeक्रिकेटसुरेश रैना दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेला मुकणार

सुरेश रैना दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेला मुकणार

टीम लय भारी

मुंबई: आयपीएलच्या यशस्वी फलंदाजांपैकी मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनावर बोली लावण्यात आलेली नाहीये. तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघाने सुद्धा रैनाला रामराम ठोकला आहे. चेन्नईच्या संघाकडून एक संदेशही जारी करण्यात आला आहे.रैनाने आयपीएलच्या १५ व्या हंगामातील मेगा लिलावात २ कोटींसाठी सहभागी झाला होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा सुरेश रैना पहिल्यांदाच आयपीएल खेळताना दिसणार नाही.(Suresh Raina will miss the IPL for the second time)

२०२० मध्ये कोरोना विषाणूमुळे रैनाने खेळण्यातून माघार घेतली होती. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे झालेल्या दोन दिवसीय लिलावात सर्व १० संघांनी ६०० खेळाडूंवर बोली लावली होती. सुरेश रैनाला पहिल्याच दिवशी  खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. तसेच दुसऱ्याही दिवशी कोणत्याही फ्रँचायझी संघाने त्याला खरेदी करण्यास रस दाखवलेला नाहीये.

यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या हंगामात सलामीवीर फलंदाज सुरेश रैना आणि स्टीव्ह स्मिथसह अजून दोन खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. सुरेश रैनाला आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज या टीमने रिटने केले नाही. तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथही विकला गेला नाही.

Suresh Raina will miss the IPL for the second time

 मिस्टर आयपीएल या नावाने प्रसिद्ध असलेला सुरैश रैनाला आयपीएल मेगा लिलाव २०२२मध्ये कोणताही खरेदीदार मिळाला नाही. यामुळे रैनाचे चाहते नाराज आहेत. मेगा लिलावात रैनाची निवड न झाल्यामुळे सीएसकेने त्याला संदेश जारी करून दिग्गज खेळाडूला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आम्हा सर्वांना दिलेल्या यलो आठवणीबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. तसेच त्यांनी चिन्ना थला असं देखील पुढे म्हटलंय. रैनाला एकेकाळी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून पाहिले जात होते. रैनावर बोली न लागल्याने चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.एखादी फ्रेंचायझी लिलावानंतरही सुरेश रैनाला आपल्या संघात घेऊ शकते. असे मानले जात होते रैनाला त्यांची जुनी फ्रेंचायझी सीएसके त्याच्यावर बोली लावू शकते.

हे सुद्धा वाचा

आयपीएलमध्ये कमिन्स, रबाडा, मार्श, स्मिथसह धवन, श्रेयस, अश्विन टॉप ब्रॅकेटमध्ये

क्रिकेटपटू क्रृणाल पांड्याचं टि्वटर अकाऊंट झाले हॅक

स्मृती मंधानाने ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयरचा किताब जिंकला

IPL Auction 2022: 10 Big Names That Went Unsold

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी