30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरक्रिकेटआयला, आपला सचिन चक्क २२ फूट उंच

आयला, आपला सचिन चक्क २२ फूट उंच

सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटच्या प्रेक्षकांचा देव. अशा या देवाचा कुणी भव्य पुतळा उभारला तर? अगदी कुणी कशाला आपल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने सचिन तेंडुलकरचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. आता तुम्ही विचारला, कुठे आहे हा पुतळा? आम्हाला आजपर्यंत का कळले नाही? तर जरा थांबा, तुमचे प्रश्न थांबवा कारण पुतळा तयार आहे फक्त त्याचे अनावरण व्हायचे आहे. आता तर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याच्या अनावरणाची तारीख देखील ठरली आहे. एकदिवसीय वर्ल्डकपचे औचित्य साधून १ नोव्हेंबरला क्रिकेटचा महामेरू, भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. क्रिक्रेटप्रेमी आणि खासकुमीर सचिन तेंडुलकर प्रेमींसाठी हा दिवस अगदी खास असणार आहे.

वास्तविक सचिन तेंडुलकरचा हा पुतळा काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाला आहे. याचे अनावरण सचिनच्या वाढदिवसी म्हणजेच २४ एप्रिलला करण्याचे प्रयत्न होते. जर तेव्हा शक्य झाले नाही तर आयसीसी वर्ल्डकपमध्ये अनावरण करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे १ नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमध्ये सचिनच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. मात्र, याची अधिकृत वेळ अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

२४ एप्रिल १९७३ ही सचिन तेेंडुलकरची जन्मतारीख. यंदा सचिन ५० वर्षांचा झाला. या निमित्ताने त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त ‘एमसीए’कडून सचिनला ही भेट आहे. क्रिकेटमध्ये सचिनची खास ओळख म्हणजे त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह. सचिनचा पुतळा म्हणजे त्याची स्ट्रेट ड्राईव्ह शैलीत फटका मारतानाचा पुतळा आहे. संपूर्ण ब्रॉन्झमध्ये घडवलेल्या या पुतळ्याची उंची २२ फूट आहे. चबुतऱ्यासह पुतळ्याची उंची २२ फूट आहे. वानखेडे स्टेडियममधील विजय मर्चंट स्टँड आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मधोमध सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात आलेला आहे.

वानखेडे स्टेडियमवर २ नोव्हेंबरला आयसीसी वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. सचिन तेंडुलकरने टीम इंडियासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. सचिन भारताकडून २०० कसोटी सामने खेळला आहे. शिवाय ४६३ एकदिवसीय सामने खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करण्याच्या बाबतीत, त्याच्या सर्वाधिक ३४ हजार ३५७ धावा आणि सचिनच्या नावावर १०० शतके आहेत.

१६ नोव्हेंबर २०१३ रोजी सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तत्पूर्वी सचिन तेंडुलकर भारताकडून २०० कसोटी सामने खेळला. त्यातील ३२९ इनिंगमधून त्याने १५ हजार ९२१ धावा काढल्या. त्याने कसोटीमध्ये ५१ शतके, ६८ अर्ध शतके काढली असून कसोटीमध्ये २४८ या त्याच्या सर्वाधिक धावा आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी