29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरक्रिकेटविराट कोहलीचे मी अभिनंदन का करायचे? 'या' संघाच्या कर्णधाराचा पत्रकारांना उलट सवाल

विराट कोहलीचे मी अभिनंदन का करायचे? ‘या’ संघाच्या कर्णधाराचा पत्रकारांना उलट सवाल

देशात अनेक दिवसांपासून आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप सुरू आहे. सर्वच संघ आपापल्या परीने चांगली कामगिरी करत आहेत. तर काही संघांना यश आले तर काही संघ स्पर्धेच्या बाहेर गेले आहेत. सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया संघ अफलातून कामगिरी करत आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वच सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. द.आफ्रिका हा दिग्गज संघ मानला जातो. या संघासोबत टीम इंडिया कशी कामगिरी करेल? यावर सर्वांचे लक्ष होते. द.आफ्रिका संघाचे टीम इंडिया संघासमोर भले मोठे आव्हान होते. हे आव्हान टीम इंडियाने इंद्रधनुष्यासारखे पेलले आहे. याच सामन्यादिवशी टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचा वाढदिवस होता. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र एका खेळाडूने त्याला शुभेच्छा न दिल्याची माहिती आता समोर आली.

काल (5 नोव्हेंबर) या दिवशी विराट कोहलीचा वाढदिवस होता. या दिवशी त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील कोलकत्ता ईडन गार्डनवर धुमशान खेळी करत 49 वे शतक करत भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरसोबत आपले नाव लावले आहे. एका बाजूला वाढदिवस आणि दुसऱ्या बाजूला शतक ठोकत मिळवलेले यश यामुळे विराटला जगभरातून शुभेच्छांच्या माध्यमातून प्रेम मिळाले आहे. मात्र श्रीलंकेचा कर्णधार मेंडिसने विराट कोहलीला शुभेच्छा देणार नसल्याचे सांगितले आहे. एका पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला आहे.

हे ही वाचा

डॉ. बाबासाहेबांच्या घटनेमुळेच दिशा मिळाली…असे का म्हणाले मनोज जरांगे-पाटील

इस्रायली सैन्याच्या गाझातील निर्वासित शिबिरावरील हल्ल्यात 33 ठार

कुस्ती एक, स्पर्धांची शहरे दोन

श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका दुखापतग्रस्त असल्याने कुसल मेंडिसला कर्णधार पदाची सुत्रे हातात दिली आहेत. श्रीलंका हा संघ विश्वचषकातून बाहेर गेला आहे. पुढील सामना बांगलादेशसोबत दिल्लीत होणार असून दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत विराट कोहलीच्या वाढदिवशी विराटला शुभेच्छा न देण्याबाबत मेंडिसला पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मेंडिस म्हणाला की, मी विराटला का शुभेच्छा देऊ? असा उलट सवाल मेंडिसने पत्रकारांना केला आहे. मेंडिसला विचारलेल्या प्रश्नाबाबत मेंडिसने विराटबाबत दिलेले उत्तर हे अनपेक्षित असल्याच्या चर्चा आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी