टीम इंडिया क्रिकेटपटू आणि बॉलीवूडकरांचे अस्सल नाते आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटर यांच्यात अनेकदा विवाह झाल्याचं तसेच अफेयरच्या चर्चा सुरू असल्याच्या गोष्टी फार काही नवीन नाहीत. हे सेलिब्रिटी किती पैसे कमावतात? यांची जीवनशैली कशी असते? ते कोणत्या कंपनीचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात. भारताचा अष्टपैलू खेळाडू विराट कोहली (Virat kohli) एका इंस्टाग्राम पोस्टसाठी (Instagram Post) किती पैसे घेतो असं अनेकांना पडलेला गहन प्रश्न आहे. तो एका इंस्टा पोस्टसाठी एक नाही, दोन नाही तर तब्बल 14 कोटी रुपये घेतो. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) देखील एवढे पैसे घेत नाही.
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी एका जाहिरातीला आणि इंस्टा पोस्टसाठी कोट्यवधी रुपयांच्या घरात मानधन घेतात. कतरीना कैफ, आलीय भट आणि दीपिका पादुकोण या अभिनेत्री देखील कोट्यवधी रुपये मानधन घेतात. यासाठी कतरीना इंस्टा आयडीवर पोस्ट करण्यासाठी 1 कोटी इतके मानधन घेते. तर आलीय भट ही कतरीना कैफहून अधिक 1 कोटी ते 2 कोटी एवढे मानधन घेते.
View this post on Instagram
हे ही वाचा
१४ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात; नवी मुंबई मेट्रो अखेर धावणार
जालना जिल्ह्यात ‘ओबीसी एल्गार महासभा’ ‘या’ नेत्याने पोस्टर शेअर करत दिली माहीती
‘मनोज जरांगेंच्या मागून कोणी तरी बोलतंय’?
दरम्यान, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू किंग विराट कोहलीचे इंस्टावर 258 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. यामुळे विराट एका इंस्टा पोस्टसाठी 14 कोटी रुपये मानधन घेतो. अक्षय कुमारला एवढे मानधन मिळत नाही. तो 2-3 कोटी रुपये मानधन घेतो. बॉलिवूडचा खिलाडी अनेकदा चर्चेत असतो. मात्र आता त्याला मिळणाऱ्या मानधनाबद्दल विचारले जात असून अक्षय कुमारच्या इंस्टा आयडीला 65.8 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर प्रियांका चोपडा एका इंस्टा पोस्टसाठी 2 कोटी रुपये मानधन घेते. भारतात इंस्टा आयडीवर पोस्ट करण्यासाठी विराट कोहली एवढी रक्कम आतापर्यंत कोणीच घेतली नाही.