28 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरक्रिकेटविराटच्या गोलंदाजीवर अनुष्काला हसू आवरेना

विराटच्या गोलंदाजीवर अनुष्काला हसू आवरेना

देशातील आयसीसी वनडे वर्ल्डकप (ICC One day Wordcup) अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. टीम इंडिया आणि नेदरलँड्स (India Vs Netharlands) संघात (12 नोव्हेंबर) दिवशी टीम इंडियाने अनोखी दिवाळी साजरी करत नेदरलँड्सला 410 धावांचे टार्गेट दिले. या सामन्यात काही नवीन प्रयोग करण्यात आले आहेत. मात्र हे प्रयोग यशस्वी ठरण्यामागे टीम इंडिया आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शक्य झाले आहे. 9 सामन्यात 9 विजय मिळवणार टीम इंडियाचा पहिला वहिला कर्णधार रोहित शर्मा ठरला आहे. त्याचप्रमाणे विराट कोहलीने (Virat Kohli) यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अफलातून कामगीरी केली आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल तीन रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत.

सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीने ४९ वे शतक केले आहे. तर इतर संघातील अनेक खेळाडूंनी चांगली कामगीरी करत वेगवेगळे रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. भारतीय फलंदाज रोहित शर्माने सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये आपले नाव लावले आहे. अशातच आता भारतीय खेळाडू विराट कोहलीने रेकॉर्ड्वर रेकॉर्ड्स करणे सुरू ठेवले आहे. विराट कोहलीला अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते. २०२३ च्या वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून विराटने नवीन रेकॉर्ड केला आहे. एवढंच काय तर त्याने (१२ नोव्हेंबर) नेदरलॅंडविरूद्ध गोलंदाजी करत विकेट घेतली आहे. यावेळी अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) बेदुंध होत, सैराटासारखी हसत विराटला चेअरप करु लागली. विराटने घेतलेल्या विकेट्सचे तिला खूपच कौतुक वाटू लागले. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी देखील कोहलीने काही फलंदाजांना बाद केले होते.

हे ही वाचा

500 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ‘हे’ भारतीय फलंदाज टॉप फाईव्ह

‘देवी’च्या जन्मानंतर बिपाशा बासूचं काय झालं पाहा?

शरद पवार लवकरच सरकारमध्ये; रवी राणांचं स्फोटक विधान

यापूर्वी कोहलीने ‘या’ फलंदाजांना केले बाद

याआधी विराटने २०१७ मध्ये गोलंदाजी केली होती. थेट सहा वर्षांनंतर गोलंदाजी केली आहे. मात्र नेदरलॅंड्स विरूद्धच्या सामन्यात सिराजला दुखापत झाल्याने गोलंदाजीचा भार हा विराट कोहलीने स्वत:च्या खांद्यावर घेतला होता. याच षटकात कोहलीने नेदरलॅंड्सचा कर्णधार एॅडवर्ड्सला बाद केले. यावेळी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी वातावरण दणाणूण सोडले. यावेळी अनुष्काला विराटने घेतलेल्या विकेट्सचा आनंद गगणात मावला नाही. तर उर्वरित सिराजची काही षटकं शुभमन गीलने पूर्ण केली. स्कॉट एॅडवर्ड्स, ब्रेडम मॅक्युलम, क्विंटन डि कॉक, अॅलिस्टर कूक या फलंदाजांना विराट कोहलीने बाद केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी