34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रिकेटWPL 2023 : स्मृती मंधानाला लागली सर्वाधिक बोली; 'या' खेळाडूंवर कोट्यवधींचा पाऊस!

WPL 2023 : स्मृती मंधानाला लागली सर्वाधिक बोली; ‘या’ खेळाडूंवर कोट्यवधींचा पाऊस!

महिला आयपीएल सामन्यांसाठी आज खेळाडूंची लिलाव प्रक्रिया मुंबईत सुरु आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये जगभरातील 400 हून अधिक महिला क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला आहे. या लीलाव प्रक्रीयेमध्ये सर्वाधिक बोली भारतीय खेळाडू स्मृती मंधानावर लागली. स्मृती मंधानाला (Smriti Mandhana) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (RCB)3 कोटी 40 लाख रुपयांना खरेदी केले आहे. स्मृती मंधाना ही भारतीय महिला क्रिकेट संघातील एक महत्वाची खेळाडू आहे BCCI यंदा पासून महिला आय़पीएलचे आयोजन करत असून महिला आयपीएलचे सामने पुढच्या महिन्यांपासून सुरु होणार आहेत.


लिलावात  विकले गेलेले खेळाडू 


  • स्मृती मंधना (आधारभूत किंमत 50 लाख) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 3.4 कोटींची बोली लावून खरेदी केले.
  • हरमनप्रीत कौर (आधारभूत किंमत 50 लाख) मुंबई इंडियन्सने 1.8 कोटींची बोली लावून खरेदी केले.
  • सोफी डिव्हाईन (आधारभूत किंमत 50 लाख) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 50 लाखांची बोली लावून खरेदी केले.
  • ऍशलेह गार्डनर (आधारभूत किंमत 50 लाख) 3.2 कोटींची बोली लावून गुजरात जायंट्सने खरेदी केले.
  • एलिस पेरी (आधारभूत किंमत 50 लाख) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 1.7 कोटींची बोली लावून खरेदी केले.
  • सोफी एक्लेस्टोन (आधारभूत किंमत 50 लाख) युपी वॉरियर्सने 1.8 कोटींची बोली लावून खरेदी केले.
  • दीप्ती शर्मा (आधारभूत किंमत 50 लाख) युपी वॉरियर्सने 2.6 कोटींची बोली लावून खरेदी केले.
  • रेणुका सिंग (आधारभूत किंमत 50 लाख) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 1.5 कोटींची बोली लावून खरेदी केले.
  • नताली सायव्हर-ब्रंट (आधारभूत किंमत 50 लाख) 3.2 कोटींची बोली लावून मुंबई इंडियन्सने खरेदी केले.
  • ताहलिया मॅकग्रा (आधारभूत किंमत 40 लाख) युपी व़ॉरियर्सने 1.4 कोटींची बोली लावून खरेदी केले.
  • बेथ मुनी (आधारभूत किंमत40 लाख) गुजरात जायंट्सने 2 कोटींची बोली लावून खरेदी केले.
  • शबनिम इस्माईल (आधारभूत किंमत 40 लाख) युपी व़ॉरियर्सने 1 कोटींची बोली लावून खरेदी केले.
  • अमेलिया केर (आधारभूत किंमत 40 लाख) 1 कोटींची बोली लावून मुंबई इंडियन्सने खरेदी केले.
  • सोफिया डंकले (आधारभूत किंमत 30 लाख) गुजरात जायंट्सने 60 लाखांची बोली लावून खरेदी केले.
  • जेमिमाह रॉड्रिग्स (आधारभूत किंमत 50 लाख) दिल्ली कॅपिटल्सने 2.2 कोटींची बोली लावून खरेदी केले.
  • मेग लॅनिंग (आधारभूत किंमत 50 लाख) दिल्ली कॅपिटल्सने 1.1 कोटींची बोली लावून खरेदी केले.
  • शफाली वर्मा (आधारभूत किंमत 50 लाख) 2 कोटींची बोली लावून दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले.
  • अॅनाबेल सदरलँड (आधारभूत किंमत 30 लाख) गुजरात जायंट्सने 70 लाखांची बोली लावून खरेदी केले.
  • हरलीन देओल (आधारभूत किंमत 40 लाख) 40 लाखांची बोली लावून गुजरात जायंट्सने खरेदी केले.
  • पूजा वस्त्रकर (आधारभूत किंमत 50 लाख) 1.9 कोटींमध्ये मुंबई इंडियन्सला विकली गेली.
  • डिआंड्रा डॉटिन (आधारभूत किंमत 50 लाख) गुजरात जायंट्सने 60 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.
  • यास्तिका भाटिया (आधारभूत किंमत 40 लाख) 1.5 कोटी रुपयांना मुंबई इंडियन्सने खरेदी केले.
  • ऋचा घोष (आधारभूत किंमम 50 लाख) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 1.9 कोटींची बोली लावून खरेदी केले.
  • अलिसा हेली (आधारभूत किंमत 50 लाख) युपी व़रियर्सने 70 लाखांची बोली लावून खरेदी केले.
  • अंजली सरवानी (आधारभूत किंमत 30 लाख) युपी व़रियर्सने 55 लाखांची बोली लावून खरेदी केले.
  • राजेश्वरी गायकवाड (आधारभूत किंमत INR 40 लाख) युपी व़रियर्सने 40 लाखांना खरेदी केले.
  • राधा यादव (आधारभूत किंमत 40 लाख) दिल्ली कॅपिटल्सने 40 लाखांना खरेदी केले.
  • शिखा पांडे (आधारभूत किंमत 40 लाख) दिल्ली कॅपिटल्सने  60 लाखांना खरेदी केले.
  • स्नेह राणा (आधारभूत किंमत 50 लाख) गुजरात जायंट्सने 75 लाखांना खरेदी केले.
  • मॅरिझान कॅप (आधारभूत किंमत 40 लाख) दिल्ली कॅपिटल्सने INR 1.5 कोटींना खरेदी केले.
  • पार्शवी चोप्रा (आधारभूत किंमत 10 लाख) युपी व़रियर्सने 10 लाख रुपयांना खरेदी केले.
  • तितास साधू (आधारभूत किंमत 10 लाख) 25 लाखांना दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले.
  • श्वेता सेहरावत (आधारभूत किंमत 10 लाख) युपी व़रियर्सने 40 लाख रुपयांनी खरेदी केले.
  • एस. यशश्री (आधारभूत किंमत 10 लाख) युपी व़रियर्सने 10 लाखांना खरेदी केले.
  • किरण नवगिरे (आधारभूत किंमत 30 लाख) युपी व़रियर्सने INR 30 लाख रुपयांनी खरेदी केले.
  • एस मेघना (आधारभूत किंमत 30 लाख) गुजरात जायंट्सने 30 लाख रुपयांनी खरेदी केले.
  • एरिन बर्न्स (आधारभूत किंमत 30 लाख) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 30 लाख रुपयांनी खरेदी केले.
  • हीदर ग्रॅहम (आधारभूत किंमत 30 लाख) 30 लाख रुपयांमध्ये मुंबई इंडियन्सने खरेदी केले.
  • ग्रेस हॅरिस (आधारभूत किंमत 30 लाख) युपी वॉरियर्सने 75 लाखांना खरेदी केले.
  • जॉर्जिया वेअरहॅम (आधारभूत किंमत 30 लाख) गुजरात जायंट्सने 75 लाख रुपयांना खरेदी केले.
  • अॅलिस कॅप्सी (आधारभूत किंमत 30 लाख) दिल्ली कॅपिटल्सने 75 लाख रुपयांना खरेदी केले.
  • ईस्सी वोंग (आधारभूत किंमत 30 लाख) 30 लाख रुपयांना मुंबई इंडियन्सने खरेदी केले.
  • मानसी जोशी (आधारभूत किंमत 30 लाख) गुजरात जायंट्सने 30 लाख रुपयांना खरेदी केले.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी