भारताचा स्टार फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. एरवी क्रिकेटच्या मैदानात भल्याभल्या फलंदाजांना स्वतःच्या बॉलिंग समोर झुकवणारा युझी ह्यावेळी मात्र स्वतः झुकला आहे ते ही बागेश्वर बाबाच्या चरणी! नुकतीच यजुवेंद्र चहलने मध्य प्रदेशमधील बागेश्वर धाम येथे भेट दिली आहे. बागेश्वर धाम पिठाचे पिठाधीश्वर धिरेन्द्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा यांची त्याने भेट घेतली आहे. आशिया चषकासाठी युझी चहलला संघात स्थान मिळाले नव्हते. मंगळवारी, विश्वचषक स्पर्धेसाठी संघनिवड होण्याच्या पूर्वसंध्येला चहलने बागेश्वर धाम गाठले. परंतु, विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात चहलची निवड होऊ शकली नाही त्यामुळे बागेश्वर बाबाचे आशीर्वाद कमी पडले की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गुगली के जादूगर और भारतीय क्रिकेट के स्टार श्री युजवेंद्र चहल जी ने पूज्य सरकार का आशीर्वाद लिया…. pic.twitter.com/Beld4jDpuo
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) September 3, 2023
बागेश्वर धाम सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन चहलच्या भेटीचे फोटो आणि विडिओ पोस्ट करण्यात आले होते. या भेटीनंतर चहलने सांगितले की, “इथे आल्यावर प्रसन्न वाटतं.. खूप वर्षांपासून मी धीरेंद्र शास्त्री यांना ओळखतो. यापूर्वी मी त्यांना टीव्हीवर पहायचो आणि आता त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन मला आनंद झाला आहे.”
सीकर में बागेश्वर धाम सरकार के दर्शन करने के लिए पहुंचे भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल..| @BageshwarDhamSarkar pic.twitter.com/eIHyUZ8ooo
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) September 2, 2023
युझी चहल हा बागेश्वर बाबाच्या चरणी लीन झाला असला तरी बागेश्वर बाबाचे आशीर्वाद कमी पडल्याचे दिसून येत आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी चहलची भारतीय संघात निवड होऊ शकली नाही. त्याच्याऐवजी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान मिळाले आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघात फार बदल केले नसून आशिया चषकातील संघाप्रमाणेच हा संघ असेल. फक्त फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याला संधी मिळाली असून आशिया चषक संघातील तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघात स्थान मिळू शकले नाही. आशिया चषक संघातून डच्चू मिळालेल्या यजुवेंद्र चहल विश्वचषक संघात ही स्थान मिळवू शकला नाही. आशिया चषकात राखीव खेळाडू म्हणून प्रवास करणाऱ्या संजू सॅमसन याला देखील संघात स्थान मिळाले नाही. याशिवाय, संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेले फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि सलामीवीर शिखर धवन यांनादेखील संधी मिळू शकलेली नाही.
हे ही वाचा
वर्ल्डकप साठी भारतीय संघ जाहीर; या बड्या खेळाडूला मिळाला टीममधून डच्चू
बूमराह झाला ‘बाप’! इन्स्टावरुन दिली ही मोठी बातमी..
आशिया चषक २०२३: पाकिस्तानबद्दल हे काय म्हणाला अश्विन?
विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचे वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान – १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश – १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड – २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका – २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स – १२ नोव्हेंबर, बंगळुरू